जालना-गेल्या 3 दिवसांपासून जालना जिल्ह्यासह पूर्ण महाराष्ट्र मराठा आरक्षणासंदर्भात विविध घडामोडींनी धुमसत आहे. विशेष करून जालना जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे मत आता शासनाचेही झाले आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी केशव नेटके यांनी जालना जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये काही निर्बंध लादले आहेत .उद्या दिनांक 4 सप्टेंबर च्या पहाटे सहा वाजल्यापासून दिनांक 17 सप्टेंबर च्या मध्यरात्रीपर्यंत हे निर्बंध लागू लागणार लागू राहणार आहेत. यासंदर्भात आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी अप्पर जिल्हादंडाधधिकार्यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की,
ज्या अर्थी सध्या मराठा आरक्षण आंदोलनाचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे ,तसेच दिनांक सहा रोजी श्रीकृष्ण जयंती, दिनांक सात रोजी गोपाळकाला, दिनांक 14 रोजी पोळा आणि दिनांक 17 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, असे सण आहेत. सध्या महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर विविध कारणांवरून आरोप प्रत्यारोप करत आहेत. तसेच मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन ,उपोषण, धरणे मोर्चा ,निदर्शने ,रास्ता रोको इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याआधी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)अन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करून शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास पुढील कृत्य करणार नाही. शस्त्रे ,लाठ्या, सोटे,बंदुके,तलवारी ,भाले, चाकू व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणाऱ्या वस्तू जवळ बाळगणार नाही .तीक्ष्णपदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तू जवळ बाळगणार नाही .व्यक्तींच्या किंवा समूहाच्या भावना जाणून बुजून दुखविण्याच्या उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेशी भाषण, अंग विक्षेप, विडंबनापर नक्कल करणार नाही, आणि सभ्यता किंवा नीतिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माझे अशी चित्रे, निशाणी घोषणापत्रे किंवा कोणतीही वस्तू बाळगणार नाही.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172