जालना- 2018 चा शेतकऱ्यांचा पिक विमा अद्यापपर्यंत मिळालेला नाही, तो त्वरित देण्यात यावा अन्यथा मंत्रालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा पिक विमा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे .

     संघर्ष समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांन जिल्हा परिषद सदस्य तथा परतुर तालुका पिक विमा संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजी बाप्पा सोनवणे म्हणाले की 2018 मध्ये जिल्ह्यातील नऊ लाख 75 हजार शेतकऱ्यांनी 250 कोटी रुपये पिक विमा भरला होता .आय. सी. आय. सी. आय. लॅमबोर्ड ही कंपनी  पिक विमा एजन्सी चालवत होती. याची संरक्षित रक्कम एक हजार 352 कोटी रुपये होते, कंपनीने केवळ 55 कोटी रुपये मंजूर केले आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात देणार म्हणून एकशे एक कोटी रुपये दिले, असे सांगितले आहे. मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना ही रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शासनाने लक्ष घालून शेतकऱ्यांना त्वरित पिक विमा मिळवून द्यावा. अन्यथा मंत्रालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा या पिक विमा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

या पत्रकार परिषदेला शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय कदम, शिवाजी लकडे, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

*ताज्या आणि सविस्तर बातम्या पाहण्यासाठी डाऊनलोड कराedtv jalna app*

Share.

Comments are closed.

Exit mobile version