जालना- गणेशोत्सव, पोळा ,महालक्ष्मी ,आणि इतर सर्वच सन उत्साहात साजरे करता यावेत आणि नागरिकांनी ते निर्भीडपणे साजरे करावेत याची खात्री देण्यासाठी तत्पर असलेल्या पोलीस प्रशासनाच्या वतीने दिनांक 13 रोजी जालना शहरातील चारही पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांनी शहरातून पथसंचलन केले.

गणेशोत्सव सणाचे अनुषंगाने पोलीस स्टेशन सदर बाजार  व पोलीस स्टेशन कदीम जालना हद्दीत श्री गणरायाच्या विसर्जनाचा मुख्य मार्ग ,मामा चौक, ,सावरकर चौक ,मोती मज्जित ,फुल बाजार ,दाना बाजार ,शोला चौक ,नरनारायण मंदिर, बडी सडक ,श्रीराम मंदिर, उडपी चौक टांगा स्टॅन्ड ,सराफा, कादराबाद चौक ,पाणी वेस, गरीब शहा बाजार मंमादेवी , डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मस्तगड ,गांधी चमन, टाऊन हॉल ,शनी मंदिर, कचेरी रोड ,काली मज्जित मार्गे पथसंचलन  करण्यात आले यामध्ये . उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह ,4 पोलीस निरीक्षक, 11 दुय्यम अधिकारी, 165 अंमलदार ,होमगार्ड, एस आर पी एफ च्या2 तुकड्या आरसीपी व महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक , वीज वितरण कंपनीचे  अधिकारी व कर्मचारी असे हजर होते.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version