जालना-आपल्याच आपल्याच विभागातील एका सहकार्याचे 91 हजार रुपयांचे वैद्यकीय देयक देण्याला ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना आरोग्य सहाय्यकाला रंगेहात पकडण्यात आले आहे. दुपारी जेवणाच्या वेळेत जिल्हा परिषदेत हा कार्यक्रम झाला.
या प्रकरणातील तक्रारदाराची जालना जिल्ह्यातून नांदेड येथे सुमारे सहा महिन्यांपूर्वी बदली झाली आहे. ही बदली होण्यापूर्वी तक्रारदाराने दोन वैद्यकीय देयके आरोग्य विभागाला सादर केली होती. दोन देयके मिळून एकूण 91 हजार 221 रुपयांची रक्कम होती. सदरील रक्कम त्वरित मिळावी या मागणीसाठी यापूर्वीच तक्रारदाराने रमेश राठोड आणि अन्य एक सहकारी सुधाकर मांटे यांना पाच हजार रुपये दिले देखील होते. तरी देखील काम झाले नाही. या दरम्यान तक्रारदाराची नांदेड जिल्ह्यात बदली झाली. त्यामुळे हे देयक तेथील जिल्हा परिषद कडून घेण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळावे म्हणून दिनांक 12 जुलै रोजी तक्रारदाराने अर्ज केला होता परंतु हे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी वारंवार टाळाटाळ झाली. याच दरम्यान तक्रारदाराकडे आरोग्य विभागाच्या कनिष्ठ सहाय्यक श्रीमती सरोज बीडला यांना देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच रमेश राठोड यांनी मागितली. या मागणीची पडताळणी लाचलुचपत विभागाच्या वतीने केल्यानंतर आज दिनांक 14 रोजी दुपारी जेवणाच्या वेळेत अडीच ते तीन वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभागात रमेश रामधन राठोड व 48 वर्ष, पद आरोग्य सहाय्यक वर्ग तीन याला दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
edtv jalna news App on play store,
web-www.edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172
edtv jalna news App on play store,
web-www.edtvjalna.com
you tube-edtvjalna
Dilip Pohnerkar-9422219172