जालना- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला टीबी म्हणजेच क्षयमुक्त करण्यासाठी विशेष अभियान सुरू केले आहे .या अभियानांतर्गत समाजातील विविध दानशूर आणि सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या कारखान्यांच्या मदतीने कुष्ठरोग्यांना एका विशिष्ट वाटप केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून फळे व भाजीपाल्याच्या क्षेत्रात बियाण्यांचे नवीन संशोधन आणि उत्पादन करणाऱ्या कलश सीड्स च्या वतीने आज क्षयरोग असलेल्या रुग्णांना या किटचे वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते हे कीट देण्यात आले. यावेळी कलश सीड्स चे कार्यकारी संचालक समीर अग्रवाल, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ए. बी. जगताप यांच्यासह , क्षयरोग विभागाचे पर्यवेक्षक श्रीकांत यादव, वैद्यकीय अधिकारी रमेश काकडे, कलश सीड्स चे पंकज अबोटी नरेंद्र पांडे विजय बायस, अभिलाष पहाडे, सुनील बियाणी यांची उपस्थिती होती.

पोषण आहाराच्या या किटमध्ये तांदूळ तीन किलो, तुरदाळ दीड किलो, खाद्यतेल 500 ग्राम ,शेंगदाणे एक किलो, मुग डाळ दीड किलो, असे साहित्य आहे.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version