Jalna District

चंद्रप्रकाशात रंगला हिंदी -मराठी गाण्यांचा कार्यक्रम

जालना- येथील रुक्मिणी परिवार आणि सांस्कृतिक मंच यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हिंदी- मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबाद येथील गीत गंध संस्थेच्या कलाकारांनी हिंदी आणि मराठी गाण्यांच्या जोरावर रसिकांकडून टाळ्यांची दाद मिळविली.

 

या संच मध्ये अरविंद पिंगळे, ज्योत्सना स्वामी या दोघांनी गायनाची जबाबदारी पार पाडली तर मिलिंद डोलारे आणि मिलिंद प्रधान यांनी संगीताची बाजू सांभाळली. निवेदक म्हणून अविनाश थिगळे यांनी भूमिका पार पाडली. सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये जुन्या हिंदी गाण्यावर जास्त भर देण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान काही मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत कर्ते म्हणून श्रीमती शालिनी पुराणिक आणि अजिंक्य जांभोरकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश मगरे, रवी पुरानिक, आर. आर. जोशी. किशोर देशपांडे, चंद्रकांत कुलकर्णी, वैशाली पाठक, शुभांगी देशपांडे, श्रीमती शालिनी पुराणिक यांनी परिश्रम घेतले.

*दिलीप पोहनेरकर*

edtv news,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button