Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आता नाही चालणार शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवसाचा पुळका!

    प्रेरणादायी मुलाखत; रोमांचक गिर्यारोहणांमधून रोजगार आणि नोकरीच्या संधी- गिर्यारोहक किशोर नावकर यांची माहिती

    वारी.. आत्मपरीक्षणाची, स्वावलंबनाची, प्रेरणा देण्या-घेण्याची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची!

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » संगीता लाहोटी खून खटला; दोन दिवसात तपासले चार साक्षीदार;
    Jalna District

    संगीता लाहोटी खून खटला; दोन दिवसात तपासले चार साक्षीदार;

    EdTvBy EdTvAugust 22, 2023No Comments3 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- शहरातील पोस्ट ऑफिस भागात राहणाऱ्या संगीता लाहोटी यांचा दिनांक 14 डिसेंबर 2021 रोजी त्यांच्या घरी नोकर असलेल्या भीमराव धांडे यांनी खून केल्याचा आरोप धांडे यांच्यावर करण्यात आला आहे.  हा खून खटला फिर्यादीने केलेल्या मागणीनुसार सरकार पक्षाच्या वतीने प्रसिद्ध वकील उज्वल निकम हे लढत आहेत, तर बचाव पक्षाच्या वतीने एडवोकेट अनिरुद्ध घुले हे आपली बाजू मांडत आहे .यापूर्वी दिनांक 10 आणि 11 जुलै रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली होती त्यानंतर आता दिनांक 21 ,22 आणि 23 असे तीन दिवस ही सुनावणी सुरू  राहणार होती परंतु फिर्यादी पक्षाच्या वतीने काही अडचण आल्यामुळे ही सुनावणी आता दिनांक 12 सप्टेंबर रोजी होणार आहे.

    प्रमुख जिल्हा व सत्र न्यायमूर्ती श्रीमती वर्षा मोहिते यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. काल दिनांक 21 रोजी सीसीटीव्ही कॅमेरा चे काम करणारे राम जाधव आणि सीए खती यांची साक्ष नोंदविण्यात आली. आज दिनांक 22 रोजी दुसऱ्या दिवशी संगीता लाहोटी यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेची साक्ष नोंदविण्यात आली. या महिलेने नोंदविलेल्या साक्षीनुसार या महिलेला आरडा ओरड ऐकू आल्यानंतर ती लाहोटी यांच्या घरात गेली आणि त्यावेळी भीमराव धांडे हे संगीता लाहोटी यांच्यावर वार करत होते त्यावेळी धांडे यांनी या महिलेला तू पण निघून जा नाहीतर तुला पण ठार मारून टाकेल असे म्हटल्याचे सांगितले आहे त्यावेळी तिथे दुसरे कोणीच नव्हते असेही त्या म्हणाल्या दरम्यान बचाव पक्षाच्या वतीने उलट तपासणी करत असताना विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तफावत आल्यामुळे मी अन फळ आहे आणि मला विचारलेला प्रश्न समजला नाही असेही त्यांनी सांगितले दरम्यान 14 तारखेला खून झाल्यानंतर पुढील दहा दिवस मी घराच्या बाहेरच पडले नाही आणि भीतीपोटी पुढे काय झाले याची देखील माहिती मी घेतली नसल्याचेही या महिलेने सांगितले याच वेळी बचाव पक्षाच्या वतीने फिर्यादीने तुम्हाला मदत केल फिर्यादीने तुम्हाला आर्थिक मदत केली म्हणून साक्ष देण्यास तयार झाल्या का असा प्रश्न विचारला असता या महिलेने नकार दिला आहे.

    दुसरे साक्षीदार म्हणून जालना नगरपालिकेत कार्यरत असलेले कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रीकर यांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यांनी दिलेल्या साक्षीनुसार दिनांक 14 डिसेंबर रोजी त्यांना सकाळी दहा वाजेच्या सुमारास सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी फोन करून सरकारी पंच म्हणून बोलावले .त्यांच्यासोबत सुभाष तायडे यांना घेऊन ते संगीता लाहोटी यांच्या घरी गेले. त्यांच्या घराच्या काचा फुटलेल्या होत्या .तिथे एक दगड पडलेला दिसला ,त्यानंतर ऑफिसच्या बाजूच्या खोलीत भीमराव धांडे बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते, आणि हे धांडे आहेत हे हर्षवर्धन लाहोटी यांनी दाखवले त्यावेळी तिथे विषयाची बाटली आणि धांडे यांनी उलटी केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी धांडे यांना उपचारासाठी हलवले. त्यांना हलवल्यानंतर स्वयंपाक घरात गेल्यावर गॅसची शेगडी आणि चाकूचे स्टॅन्ड दिसले. त्याच्या बाजूला डायनिंग हॉलमध्ये गेल्यानंतर संगीता लाहोटी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांच्या छातीवर चाकूचा वार होता ,एका चाकूला मूठ नव्हती आणि कमरेमध्ये काळ्या रंगाचा चाकू दिसला. त्यासोबत दोन चाकू बाजूलाच वाकडे झालेले पडलेले होते . हे सर्व साहित्य फुलंब्रीकर यांना दाखविल्यानंतर त्यांनी हेच साहित्य असल्याचे सांगितले . सरकार पक्षाच्या वतीने तपासणी केल्यानंतर उलट तपासणी करताना एडवोकेट अनिरुद्ध घुले यांनी विचारलेला प्रश्नांना उत्तर देताना विजय फुलंब्रीकर म्हणाली की, पंच म्हणून जाण्यासाठी तत्कालीन पालिकेचे मुख्याधिकारी श्री. नार्वेकर यांनी लेखी पत्र दिले नव्हते, मृतदेहाच्या बाजूला रक्त किती पसरले होते? ते एक दीड फूट पसरले असल्याचे फुलंब्रीकर यांनी सांगितले. चाकूवर रक्त होते का? या प्रश्नाला उत्तर देताना फुलंब्रीकर म्हणाले की निरखून पाहिले नाही. त्यासोबत पोलिसांनी आणि हर्षवर्धन लाहोटी यांनी जेवढे दाखवले तेवढेच पाहिले वरच्या मजल्यावर जाऊन आपण पाहिले नसल्याचेही साक्षीदार विजय फुलंब्रीकर यांनी बचाव पक्षाला सांगितले.

    सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
    दिलीप पोहनेरकर-9422219172

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    court dgp ipc302 jalna jalna sp एडवोकेट अनिरुद्ध घुले खून जिल्हा व सत्र न्यायालय भीमराव धांडे विधीज्ञ उज्वल निकम संगीता लाहोटी खून खटला हर्षवर्धन लाहोटी
    Share. Facebook WhatsApp
    Previous Article“त्या कॉफी समथिंग” मध्ये तरुणीला ब्लेड चा धाक दाखवून बलात्कार ;दोन वेळा गर्भपात ;आरोपी फरार
    Next Article पोलीस आयुक्त जिल्ह्यात असतांना पोलीस उपनिरीक्षकाने घेतली तीस हजारांची लाच
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    आता नाही चालणार शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवसाचा पुळका!

    July 2, 2025

    प्रेरणादायी मुलाखत; रोमांचक गिर्यारोहणांमधून रोजगार आणि नोकरीच्या संधी- गिर्यारोहक किशोर नावकर यांची माहिती

    July 2, 2025

    थेट आषाढी वारी मधून….

    June 29, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,064 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,183 Views

    नोकरीच्या शोधात? एक हजार एकशे जागांमध्ये तुमचा नंबर शंभर टक्के!

    June 21, 2025910 Views

    जालन्यात उद्या पुन्हा रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन!

    June 10, 2025806 Views
    Don't Miss
    Breaking News July 2, 2025

    आता नाही चालणार शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवसाचा पुळका!

    जालना- कोविड 2019 मध्ये बहुतांश जनता ही घरीच होती .विशेष करून महिला आणि तरुणींनी युट्युब…

    प्रेरणादायी मुलाखत; रोमांचक गिर्यारोहणांमधून रोजगार आणि नोकरीच्या संधी- गिर्यारोहक किशोर नावकर यांची माहिती

    वारी.. आत्मपरीक्षणाची, स्वावलंबनाची, प्रेरणा देण्या-घेण्याची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची!

    थेट आषाढी वारी मधून….

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आता नाही चालणार शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवसाचा पुळका!

    प्रेरणादायी मुलाखत; रोमांचक गिर्यारोहणांमधून रोजगार आणि नोकरीच्या संधी- गिर्यारोहक किशोर नावकर यांची माहिती

    वारी.. आत्मपरीक्षणाची, स्वावलंबनाची, प्रेरणा देण्या-घेण्याची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची!

    Most Popular

    जवसगाव शिवारातून गौण खनिजाचा अवैध उपसा

    April 27, 20210 Views

    शॉटसर्किटने दीड एक्कर ऊस जळून खाक

    April 27, 20210 Views

    माळरानावरील झाडांमध्ये वाऱ्याप्रमाणे पसरली आग; जीवितहानी नाही

    April 27, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.