राज्य

पालिकेच्या सफाई कंत्राटदाराची “शाळा”; अध्यक्ष करणार मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

जालना -राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. व्यंकटेशन यांनी गुरुवारी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यां संदर्भात बैठक घेतली. या बैठकीमध्ये सफाई कर्मचारी न बोलावल्यामुळे आयोगाचे अध्यक्ष व्यंकटेशन यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत आपण मुख्यमंत्र्याकडे याविषयी तक्रार करू आणि एवढेच नव्हे तर ज्यांच्यासाठी ही बैठक आहे त्यांनाच बोलावले नाही तर बोलायचे कोणासोबत? असे म्हणत सफाई कंत्राटदाराला चांगलेच धारेवर धरले.

दरम्यान जालना नगरपालिकेमध्ये अनुकंपा तत्त्वावर लागलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची मुले ही सुशिक्षित असल्यामुळे ते अशा पद्धतीचे स्वच्छतेचे काम करण्यास धजावत नाहीत, आणि सुशिक्षित असल्यामुळे नगरपालिकेत देखील त्यांच्याकडून काम करून घेता येऊ शकते म्हणून अशा कामगारांना नगरपालिकेत वर्ग करण्यात आले आहे अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी दिली.

सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष व्यंकटेशन हे तामिळनाडूचे आहेत. त्यामुळे त्यांना तामिळी भाषा येते आणि जालन्यात मराठी भाषिक आहेत या दोघांमध्ये दुवा साधत त्यांच्यासोबत असलेल्या द्विभाषिकाच्या माध्यमातून त्यांनी edtv news सोबत संवाद साधला. सफाई कामगारांच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सफाई कामगारांना योग्य तो मोबदला मिळालाच पाहिजे, आणि तो मिळतो किंवा नाही हे पाहण्यासाठीच आज आपण बैठक बोलावली आहे. दरम्यान शहरांची वाढती सीमा लक्षात घेता सफाई कर्मचारी कमी पडतात हे बरोबर आहे, मात्र ते किती आवश्यक आहेत आणि किती आहेत याचा सर्व अहवाल आपण राज्याला देऊ आणि त्यानुसार भरती करण्याच्या सूचना करू असेही ते म्हणाले.

दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेण्यात आली .यावेळी नगर पालिकेच्या सफाई कंत्राटदार देखील उपस्थित होता. परंतु सफाई कामगारांना देण्यात येणारे वेतन त्यांचा कपात करण्यात येणारा भविष्य निर्वाह निधी, त्यांची भरती प्रक्रिया, याविषयी कोणते समाधानकारक उत्तर त्याला देता आले नाही. उलट शासकीय नियमानुसार प्रत्येक सफाई कामगाराला साडे चारशे रुपये दररोज या प्रमाणे वेतन आणि 13 टक्के कंत्राटदारांनी 13% सफाई कामगार अशा पद्धतीने भविष्य निर्वाह निधी भरत असल्याचेही त्यांनी सांगितले मात्र याबद्दल अध्यक्षांनी पुरावे मागितले असतात कोणताही कागद त्याला देता आला नाही.

सफाई कंत्राटदाराच्या बद्दल असलेल्या तक्रारींना मुख्याधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोपही सफाई कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. परंतु ज्यांच्या वर अन्याय होत आहे किंवा ज्यांच्या तक्रारी आहेत त्यापैकी कोणत्याच सफाई कामगाराला, पालिकेने कंत्राटदाराने, किंवा सफाई कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षांनी बोलावलेले नव्हते, त्यामुळे नेमका काय प्रकार आहे हेच समजू शकत नाही त्यामुळे खरे काय आणि खोटे काय समजायचे? कसे असे म्हणत या सर्व प्रकाराची तक्रार आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही आयोगाचे अध्यक्ष म्हणाले.

दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सारवासारव करत नगरपालिकेत सुरु असलेल्या सफाई कामगारांच्या अनागोंदी कारभार संदर्भात चौकशी करावी अशा सूचना पालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांना दिल्या.
-दिलीप पोहनेरकर, edtv news ,9422219172

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.