बाल विश्व

आरक्षणासाठी रा.स.प.चा रास्ता रोको


जालना
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा तिढा जोपर्यंत सुटत नाही ,तोपर्यंत कोणतीही निवडणूक घेऊ नये, या प्रमुख मागणीसह अन्य काही मागण्यांसंदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाने आज रविवार दिनांक 4 रोजी रास्ता रोको केला. अंबड चौफुली भागात झालेल्या या रास्ता रोको चं नेतृत्व या पक्षाचे जिल्हा प्रभारी ओमप्रकाश चितळकर यांनी केले.

बोलतांना ओमप्रकाश चितळकर

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला असलेला आरक्षण न्यायालयाच्या आदेशान्वये काढून घेण्यात आले आहे या सर्व प्रकरणाला आघाडी सरकारच जबाबदार आहे असा आरोप राष्ट्रीय समाजवादी पक्षाने केला आहे आणि त्या अनुषंगाने अनुभव लिखित डाटा न्यायालयात त्वरित जमा करावा जेणेकरून न्यायालय हे आरक्षण कायम ठेवेल तसेच ओबीसी आयोगाची स्थापना करून न्यायालयीन बाबींची पूर्तता करावी अशी मागणीही आज करण्यात आले आहे यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे अंबड चौफुली भागात झालेल्या रास्ता रोको मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या वतीने आज जालना येथील अंबड चौफुली येथे चक्काजाम रास्तारोको आंदोलन करण्यात आले .

या जालना जिल्हा प्रभारी ओमप्रकाश चितळकर,
मराठवाडा संपर्क प्रमुख अशोक लांडे ,जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब भोजने,युवा जिल्हा अध्यक्ष गोविंद जाधव शिवाजी तरवटे, रामेश्वर काळे ,संदीप पवार, संतोष कोल्हे, गजानन वाइसे ,तसेच जालना जिल्यातील पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button