Advertisment
जालना जिल्हा

मराठा आणि ओबीसी समाज या सरकारला माफ करणार नाही-आ.लोणीकर

परतूर-दळभद्री आणि करंट्या महा विकास आघाडी सरकारने मागासवर्गीय आयोग नेमला नाही ,१५ वेळा ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने आणि निवडणूक आयोगाने वारंवार विचारणा करून देखील एम्पिरिकल डाटा उपलब्ध करून दिला नाही, अशा या सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा, ओबीसी समाजाचे आरक्षण संपुष्टात आले असून मराठा आणि ओबीसी समाज या सरकारला कदापि माफ करणार नाही अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज हल्लाबोल केला. परतूर येथे आयोजित मराठा ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्या प्रकरणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी लोणीकर बोलत होते.

यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर ,तालुकाध्यक्ष रमेश भापकर, प्रकाश टकले ,पंजाबराव बोराडे, हरीराम माने, रामप्रसाद थोरात ,नागेश घारे जिजाबाई जाधव, माऊली शेजुळ, प्रधान बद्री ढवळे प्रवीण सातोनकर कृष्णा आरगडे प्रकाश चव्हाण भास्कर कुलवंत अभिषेक सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती.
परतूर येथील साईबाबा मंदिर परिसरासमोर झालेल्या हे आंदोलन तब्ब्ल अडीच तास सुरु होते. शेवटी बाळाचा वापर करून पोलिसांनी आंदोलकांना आंदोलनस्थळी अटक केली.

ओबीसी व मराठा आरक्षण केवळ महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाले आहे दोन्ही समाजांमध्ये महाविकासआघाडी सरकार बद्दल प्रचंड रोष आहे .दोन्ही आरक्षणामध्ये मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देणे आवश्यक आहे. परंतु महा विकास आघाडी सरकार याबाबत फारशे गंभीर नाही, परंतु महा विकास आघाडी सरकारला याचे सोयरसुतक नाही. त्या मुळे भारतीय जनता पार्टीने आक्रमक आंदोलन हाती घेतलं आहे. याची नोंद सरकारने घ्यावी व आंदोलनानंतर मराठा व ओबीसी समाज आक्रमक झाल्यास होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी महाविकास आघाडी सरकाची असेल असेही लोणीकर यावेळी म्हणाले.

-दिलीप पोहनेरकर, edtv news,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button