गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे 18 वानरांना मिळाले जीवदान
जालना -तालुक्यात पिरकल्याण आणि धारकल्याण अशी दोन गावे आहेत. या दोन्ही गावांच्या मध्यभागी पिरकल्याण नावाचं मोठे धरण आहे. आजूबाजूच्या पंधरा-वीस गावांना याच धरणातून पाणीपुरवठा होतो .धरणाच्या काठावर एका झाडावर चार दिवसांपूर्वी वानर बसले आहेत हे गावकऱ्यांना माहीत होतं ,मात्र रात्रीतून आलेल्या अचानक पावसाने या धरणात भरपूर पाणी आले आणि ही वानरे झाडावरच अडकली. सुदैवाने झाडावर वानर आहेत हे गावकऱ्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी वारंवार वन विभागाशी संपर्क साधला आणि चार दिवसांपासून झाडावर अडकलेल्या या वानरांना आज जीवदान मिळालं.
वनविभागाने वानर पकडणाऱ्या एका व्यक्तीसह आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास या तळ्याकडे मोर्चा वळविला झाडावर बसलेले सतरा वानरे बाजूने जात असलेल्या विजेच्या तार्याच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आली. तर एक वानराच पिल्लू दबा धरून बसलेला असताना वानर धरणार्या इसमाने त्याला हाताला धरून तळ्याच्या बाहेर आणून सोडले. झाडावरून हाकलून दिल्यानंतरही वानरे विजेच्या तारा च्या माध्यमातून तळ्याच्या बाहेर येत होती दरम्यान जी वानरे तारेवरून पाण्यात पडली या वानरांना तेथील व्यक्तींनी पोहत जाऊन बाहेर काढण्यासाठी मदत केली . विशेष म्हणजे या वानरांनी कोणावरही हल्ला करून जखमी केले नाही . विष्णू ढोबळे, किशोर कदम ,बाबासाहेब ढोबळे, राजेंद्र ढोबळे ,असे या गावकऱ्यांची नावे आहेत. गेल्या चार दिवसांपासून ही वानरे झाडावर अडकलेली होती आणि पुढील अनेक दिवस तळ्यातील पाणी कमी होण्याचा काहीच आकार नाही .त्यामुळे कदाचित गावकऱ्यांनी जर लक्ष दिले नसते तर या वानरांना आपला जीव गमवावा लागला असता.
-दिलीप पोहनेरकर,9422219172