जालना अंबड रस्त्यावर दोन ट्रक चा अपघात ;जीवितहानी नाही
जालना-आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास जालना- अंबड रस्त्यावर सामनगाव पाटीजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही,
मात्र दोन्ही ट्रकचे मिळून सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. बिदर कडून भंगार घेऊन जालन्यात येणारा ट्रक क्रमांक के ए 56- 5839 आणि जालन्याहून बेंगलोर कडे साबण घेऊन जाणारा हिंदुस्तान लिव्हर चा ट्रक क्रमांक एम एच 04 एच एस 06 51 या दोन्ही ट्रकची समोरासमोर धडक झाली.
या ट्रकचे 80हजाराचे तर दुसऱ्या ट्रकचे 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार दोन्ही ट्रक चालकांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल रामेश्वर काकड यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. तसेच महामार्ग पोलिसांचे पथकही घटनास्थळावर दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक अभय दंडगव्हाळ, तसेच कॉन्स्टेबल विजय बहुरे गोरखनाथ दिघोळे, यांनी या अपघातातील वाहने बाजूला काढली.
-दिलीप पोहनेरकर,
edtv news,9422219172