अतिवृष्टीच्या अनुदानासाठी आ.कुचे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या
जालना- दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांनाअतिवृष्टीचे अनुदान न मिळाल्यामुळे बदनापूर मतदार संघाचे आमदार नारायण कुचे यांनी आज दिवाळीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी आणि भोकरदन तालुक्यातील राजूर या दोन्ही मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या अनुदानापासून वगळण्यात आले आहे .शासनाच्या म्हणण्यानुसार हे नुकसान अतिवृष्टीमुळे झालेले नसून सतत पडणाऱ्या पावसामुळे झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे .त्यामुळे शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेले नाही. एकीकडे शासन सर्व शेतकऱ्यांना अनुदान दिलंआहे असं सांगत असतानाच दुसरीकडे या शेतकऱ्यांना दिवाळीच्या सणात देखील अनुदान मिळाले नाही .त्यामुळे या शेतकऱ्यांचे नेतृत्व करत बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी या दोन्ही मंडळातील शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात लाक्षणिक आंदोलन केलं. दोन्ही मंडळातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .दरम्यान आज दिवाळीचा दिवस आहे आणि शासकीय कार्यालयांना सुट्टी देखील आहे .अशा परिस्थितीत देखील नारायण कुचे यांच्या आंदोलनामुळे उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर हे कार्यालयात आलेआणि प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली.
दरम्यान येत्या आठ दिवसात जर या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही तर 12 तारखेला जालना चे पालकमंत्री राजेश टोपे ांच्या घरावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्याचा इशारा कुचे यांनी दिला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की ,पालक मंत्री यांच्या घरावर मोर्चा मध्ये काही राजकारण नाही. मात्र शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय हा सरकारचा असतो, आणि अधिकारी फक्त तो राबवितात .त्यामुळे प्रशासनाचा यामध्ये काही भाग नाही. प्रशासनाने प्रस्ताव पाठवूनही सरकारनेच निर्णय न घेतल्यामुळे जालना चे पालकमंत्री म्हणून राजेश टोपे यांच्या घरावर हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. आजच्या या आंदोलनामध्ये चांदई एक्को ,तुपेवाडी, मान देऊळगाव, आधी गावचे शेतकरी सहभागी झाले होते. शेवटी िल्हाधिकार्यांच्या वतीने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
-दिलीप पोहनेरकर, edtv 9422219172
https://edtvjalna.com/wp-content/uploads/2021/10/EdTvJalna.apk