गणपती बाप्पा मालामाल! अंगारकीला 24 लाख 40 हजारांची देणगी
जालना- जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेले राजूर येथील राजुरेश्वर गणपती आता फक्त जिल्ह्याचेच नव्हे तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत बनत आहे. गणपतीच्या साडेतीन पीठापैकी एक पूर्ण पीठ म्हणून या गणपतीची ख्याती आहे. म्हणून दिवसेंदिवस भाविकांची श्रद्धा ही वाढत आहे. याचाच परिणाम म्हणून सध्या परिस्थिती कोरोणाचा काळ असतानाही गणपतीच्या दान पेटीमध्ये अंगारकी चतुर्थी निमित्त तब्बल 24 लाख 39 हजार 914रुपये आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या महामारी च्या काळात देखील गणपती मालामाल झाला आहे. अंगारकी चतुर्थी म्हटले की सोमवारी दुपारपासूनच पायी जाणाऱ्या भाविकांचे लोंढे राजुरेश्वर आकडे जाताना दिसतात, हे भाविक जाताना पायी जातात आणि येताना बस ने परत येतात, मात्र यावेळी बसचा संप असल्यामुळे पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या कमी होती. त्यामुळे मंगळवारी सकाळी कदाचित आज भाविकांची संख्या रोडावली असे वाटले होते, मात्र दहानंतर दुचाकी आणि विविध वाहनांमधून येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आणि पाहता पाहता सुमारे सात लाख भाविकांनी राजुरेश्वराचे दर्शन घेतले. आज बुधवार दिनांक 24 रोजी मंदिर संस्थांनच्या दानपेट्या उघडण्यात आल्या. त्या उघडण्यासाठी गणपती संस्थानचे विश्वस्त गणेशराव साबळे, शिवाजी पुंगळे, मंडळ आधिकारी पी. जी. काळे, यांच्यासह अनेक तलाठी आणि संस्थांनचे कार्यालयिन अधीक्षक प्रशांत दानवे हेदेखील उपस्थित होते.
देणगीचे विवरण
1)दर्शनाचापास 1101100
२. अभिषेक देणगी 94536
३. बांधकाम देणगी 31017
४.मार्बल अर्पण देणगी 103600
एकूण : 1330253
2)दानपेटी नुसार
१. श्री दानपेटी 594306
२. बांधकाम दानपेटी 515355
एकूण: 1109661
1) 1330253
2) 1109661
एकूण बेरीज : 2439914
अक्षरी : चोवीस लाख एकोणचाळीस हजार नऊशे चौदा रुपये.
–दिलीप पोहनेरकर,९४२२२१९१७२
https://edtvjalna.com
डाउनलोड edtvjalna app