तहसीलदार चित्रक त्यांच्यावर कारवाई करा; पत्रकारांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
[sharep]
जालना-परतूर चा तहसीलदार रूपा चित्रक यांचा मनमानी कारभार वरिष्ठ व सामान्य नागरिकांच्या समोर येईल अशा सत्य परिस्थितिचे वृत्त दैनिक आनंद नगरीचे परतुर येथील पत्रकार भरत सवणे यांनी दिनांक 21 च्या अंकात प्रकाशित केले होते . त्यामुळे या तहसिलदारांनी कारभार या वार्ताहराला नोटिस देऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न केला .या प्रकारामुळे पत्रकारात संतापाची लाट पसरली आणि दि.२४ डिसेंबर रोजी परतूर व जालना येथील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना निवेदन देऊन तहसिलदार रूपा चित्रक यांच्यावर कारवाई करून बदली करण्याची मागणी केली .
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. २१ डिसेंबर २०२१ रोजी दैनिक आनंदनगरी मध्ये ‘शासनाचे कारभारी कार्यालयात वेळेवर येईना’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीत तहसील कार्यालयातील तहसीलदारांच्या बंद दालनाचा फोटो छापण्यात आला होता. या बाबत आक्षेप घेत तहसिलदार परतूर यांनी दैनिक आनंदनगरीचे परतूर येथील प्रतिनिधी यांना नोटीस बजावून, सदरील बातमीमुळे आपली प्रतिमा मलीन झाली आहे. महिला अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न या बातमी मधून झाला असल्याचा आक्षेप त्यांनी या नोटीस मध्ये नोंदविला आहे.
बातमीत इतर शासकीय कार्यालयासह परतूर येथील पंचायत समिती कार्यालयात, गटशिक्षणधिकारी कार्यालय, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय आदी कार्यालयात वेळेवर गैरहजर असणाऱ्या अधिकारी, कार्यालय प्रमुख आणि कर्मचारी यांचा उल्लेख असलेल्या बातम्या छापल्या आहेत. छापण्यात आलेल्या बातम्या प्रत्यक्ष कार्यालयात जावून वस्तुस्थिती जाणून छापण्यात आल्या आहेत. बातमीच्या संदर्भात तहसीलदार परतूर यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी तहसीलदार यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनीवर संपर्क झाला नाही.
सदरील बातमी वरून तहसीलदार परतूर नोटीसच्या माध्यमातून जाणीवपूर्वक पत्रकारांना त्रास देण्याचा प्रयत्न करून पत्रकारांची बदनामी करण्याच्या उद्देश आहे. या अगोदर ही पत्रकार यांना अशीच नोटीस देण्यात आली होती. संबंधित पत्रकार घरी न भेटल्यास नोटीस द्या नसता त्यांच्या घरावर नोटीस डकवुन फोटो काढण्याचे तोंडी आदेश तहसीलदार परतूर यांनी नोटीस देण्यासाठी आलेल्या कर्मचार्यांना दिले होते.
एकंदरीत तहसीलदार परतूर यांची पत्रकारांबद्दलची अशी वागणूक गुन्हेगारांना देण्यात येणाऱ्या वागणुकी सारखी अपमानास्पद आहे. परतूर तहसीलदार रूपा चित्रक यांची ही कृती सर्व पत्रकारांच्या भावना दुखावणारी आणि पत्रकारांची बातमी छापल्याने मुस्कटदाबी करून अपमानास्पद वागणूक देणारी आहे. पत्रकार अश्या गोष्टी खपवून घेणार नाही. या कृतीचा सर्व पत्रकार बांधव तीव्र शब्दात निषेध करत आहोत. तहसीलदार परतूर यांच्या बाबतीत तालुक्यातील अनेक नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
अनेक कामे प्रलंबित असल्याचे विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यानी त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. तहसीलदार यांची या प्रकरणी चौकशी करून त्यांना निलंबित करावे ,त्यांची तडकाफडकी बदली करण्यात यावी. नसता पत्रकार संघटनेच्या जिल्हात आंदोलन करून वतीने परतूर तहसीलदार हटाव स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात येईल. असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. या निवेदनावर अप्पासाहेब देशमुख, संपादक रवींद्र बांगड, जिल्हाप्रतींनिधी राजेश भालेराव, राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर, सुरेश कुलकर्णी, सुहास कुलकर्णी, रविकांत दानम, अच्युत मोरे, दिलीप पोहनेरकर, अमित कुलकर्णी, साहिल पाटील, शेख मुसा, सुनील खरात, शेख इलयास, शिवाजी बावणे, सय्यद अफसर, अहेमद नूर, अर्जुन पाडेवर, योगेश बरीदे, आशीष गारकर, अजय देसाई, सुरेश कवडे, सर्फराज नाईकवाडी, शेख अथर, प्रभाकर प्राधान, संजय देशमाने, राहुल मुजमूले, कैलास चव्हाण, माणिक जैस्वाल, शेख तारेख, मुमताज अंसारी, यांच्यासह अनेक पत्रकारांच्या स्वाक्षर्या आहेत.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna