दिव्यांगांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम; आठवड्यातून होणार तीन दिवस तपासणी
जालना- शरद यशवंत दिव्यांग अस्मिता अभियान अंतर्गत 12 मार्च 2022 पर्यंत जिल्ह्यातील दिव्यांगाची तपासणी करुन त्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहे.
ज्या दिव्यांग बांधवांनी सन 2019 पासून दिव्यांग नोंदणी केलेली आहे, परंतु अद्यापही जिल्हा रुग्णालय जालना येथे तपासणीस हजर झाले नाहीत. अशा दिव्यांग बांधवांनी आपले जुने नोंदणी कागदपत्रे किंवा आधार व जुना नोंदणी क्रमांक घेऊन यावा, जे कोणी नवीन दिव्यांग लाभार्थी तपासणीचे राहिले असतील, अशा लाभार्थींनीसुध्दा येऊन तपासणी करुन घेणे, जेणेकरुन जुने प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यात येईल. जिल्हा रुग्णालय जालना येथे आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार या तीन दिवशी सकाळी 9 ते 2 वेळात दिव्यांग रुग्णांची तपासणी करुन प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. तरी सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक, डॉक्टर अर्चना भोसले ,सामान्य रुग्णालय जालना यांनी केले आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna