अन्नधान्य प्रमाणे फळे आणि पालेभाज्यांची निर्यात व्हावी- सुरेश अग्रवाल
जालना- ज्याप्रमाणे भारत आता 10 ते 20 टक्के अन्नधान्य निर्यात करत आहे त्याच प्रमाणे फळे आणि पालेभाज्याही निर्यात व्हायला हव्यात . एवढे उत्पादन झाल्यानंतर या उत्पादनाच्या साठवणुकीसाठी सरकारने आतापासूनच तयारी सुरू करावी, अशी अपेक्षा कलश सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन सुरेश अग्रवाल यांनी व्यक्त केली.
शहरातील मंठा चौफुली भागात असलेल्या कलश सीड्स च्या संशोधन क्षेत्रावर शेतकरी आणि बियाणे विक्रेत्यांसाठी आज पासून पीक प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने इराण, इराक, जॉर्डन, मधून बियाणे विक्रेते आलेले आहेत.
या प्रदर्शनाबद्दल माहिती देताना सुरेश अग्रवाल म्हणाले, “1986 पासून अशाप्रकारचा शेतकऱ्यांसाठी पीक प्रात्यक्षिकाचा उपक्रम सुरू केला आहे. त्या वेळी दीड-दोन एकर मध्ये सुरु झालेला हा उपक्रम आता आठ ते नऊ एकर मध्ये सुरू आहे. येथील प्रात्यक्षिक पाहिल्या नंतरच शेतकरी स्वतःची खात्री करून घेतो. सद्य परिस्थिती मध्ये प्रात्यक्षिकांमध्ये आलेल्या पिकापेक्षा शेतकरी जास्त उत्पादन घेऊ शकतात, आणि त्यांनी ते घेतल्यानंतर भारत कुठल्या कुठे जाईल याचे स्वप्न सध्या पाहत आहोत. हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, त्यासाठी शासनाने देखील आत्तापासूनच पूर्व तयारीला लागलं पाहिजे, कारण ज्याप्रमाणे आता आपण दहा ते वीस टक्के अन्नधान्य निर्यात करत आहोत त्याचप्रमाणे अल्प काळात नाशवंत होणाऱ्या पालेभाज्या आणि फळे यांची साठवणूक करून त्याला निर्यात करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारनेही कामाला लागावे” अशी अपेक्षा सुरेश अग्रवाल यांनी व्यक्त केली.
दरम्यान दिनांक 12 जानेवारी रोजी हे पीक प्रात्यक्षिक सर्वसामान्यांसाठी खुले आहे. त्यामुळे विविध बियाण्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आणि फळे याचे कसे संशोधन होते, आणि कोणत्या उत्पादनाला कुठे जास्त मागणी आहे याची इत्यंभूत माहिती करून घेण्यासाठी हे प्रदर्शन पाहायलाच हवं.
सविस्तर पहा
www. edtv jalna.comवर,
डाउनलोड करा edtv jalna app.9422219172