मेगाब्लॉकमुळे चार दिवस तपोवन धावणार उशिरा
जालना- औरंगाबाद ते चिखलठाणा दरम्यान उड्डाण पुलाच्या बांधकामा करिता 3 तासांचा लाईन ब्लॉक, घेण्यात आलाा आहे . त्यामुळे तपोवन एक्स्प्रेस चार दिवस 30 मिनिटे उशिरा धावणार आहे.
औरंगाबाद ते चिखलठाणा दरम्यान किलो मीटर 110/5-6 वर असलेल्या रेल्वे उड्डाण पुला शेजारी नवीन उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. या पुलाचे बांधकाम करण्या करिता दिनांक 12 जानेवारी ते 15 जानेवारी, दरम्यान चार दिवस सकाळी 10.30 ते 13.30 दरम्यान तीन तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे गाडी संख्या 17617 मुंबई सी.एस.टी. ते नांदेड तपोवन एक्स्प्रेस वरील चार दिवशी मनमाड ते दौलताबाद दरम्यान 30 मिनिटे उशिरा धावेल. परंतु पुढील प्रवास ही रेल्वे वेळ भरून काढण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे आव्हान रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
*दिलीप पोहनेरकर*
9422219172
www.edtvjalna,/app-edtvjalna