विविध मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षकांचे धरणे आंदोलन
जालना -प्राथमिक शिक्षकांच्या असलेल्या विविध संघटना एकत्र येत आज काही प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
प्रमुख मागण्यांमध्ये चार मागण्यांचा समावेश आहे. त्यामध्ये सातव्या वेतन आयोगातील वरिष्ठ वेतन श्रेणी मध्ये असलेला त्रूटी दूर कराव्यात.
विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी देण्यात यावी, कारण 2014 मध्ये व त्यानंतर अनेक शिक्षकांना विशेष शिक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली पण त्यांच्या वेतनश्रेणीत कोणत्याही स्वरूपाचा बदल झालेला नाही. या सर्व शिक्षकांना पदवीधरांची वेतन श्रेणी देण्यात यावी.
जुन्या पेन्शन चा सुरू असलेला लढा संपवण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा आणि गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा लढा जुनी पेन्शन योजना लागू करून कायम संपवून टाकावा. तसेच 2001 पासून वस्तीशाळा शिक्षक मानधन तत्वावर शासनाच्या सेवेत होते. या सर्वांना शासनाने 1 मार्च 2014 पासून कायम केले आहे, परंतु त्यांची मूळ नियुक्ती हि पहिल्या दिवसापासून ग्राह्य धरलेली नाही, ती सेवा शासनाने ग्राह्य धरावी अशीही मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
देवेंद्र बारगजे, आर. आर. जोशी, ईश्वर गाडेकर, लक्ष्मण नेव्हल, जगत घुगे ,राजगुरू, संतोष देशपांडे आदी शिक्षक यावेळी उपस्थित होते.
बातमी अशी; जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास!
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
दिलीप पोहनेरकर ९४२२२१९१७२
http://www.edtvjalna.com