डॉक्टरांनी न तपासल्याचा राग मनात धरून त्याने दवाखानाच पेटवला
घनसावंगी -दारू पिऊन आलेल्या रुग्णाने आपल्यावर उपचार का केले नाहीत? याचा राग मनात धरून आठ दिवसानंतर त्या डॉक्टरचा दवाखाना पेटून देण्याची दुर्दैवी घटना घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेडा येथे काल दिनांक 17 रोजी घडली आहे.
घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड येथे डॉक्टर तानाजी शिंदे हे बी. एच. एम. एस. डॉक्टर असून गेल्या चार वर्षांपासून त्यांचा दवाखाना आहे .दरम्यान सात तारखेला गावातीलच तरुण विशाल दत्ता जाधवर हा दारू पिऊन त्यांच्याकडे आला होता आणि तपासणीची मागणी करू लागला. परंतु रात्री उशीर झाल्यामुळे डॉक्टरांनी मेडिकल बंद झाले आहे आणि हॉस्पिटलही बंद झाले आहे असे सांगितले. तसेच दरम्यान दारूच्या नशेत तो काहीतरी बोलत असेल म्हणून डॉक्टरांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले .हाच तरुण पुन्हा रविवारी संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये आला आणि पुन्हा काहीतरी बडबड करू लागला तरी देखील डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आणि संध्याकाळी नऊ वाजता दवाखाना बंद करून घरी गेले. दरम्यानच्या काळात डॉक्टर घरी पोहोचताच दवाखान्यासमोरील काही नागरिकांनी डॉक्टरांना फोन करून दवाखान्याला आग लागल्याची सांगितले. त्यावेळी डॉक्टर धावत- पळत हॉस्पिटलला आले तोपर्यंत बरेच साहित्य जळून खाक झाले होते. आरोपी विशाल दत्ता जाधव यांच्या हातात पेट्रोलच्या बॉटलही दिसत होत्या. याप्रकरणी घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
*एम.डी. पोहनेरकर*
8275950190
https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv
www.edtvjalna.com