जालना एज्युकेशन फाउंडेशनच्या शिष्यवृत्ती चा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा-प्रा.लाहोटी
जालना -गुणवत्ता आहे मात्र आर्थिक सुबत्ता नाही त्यामुळे समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेतून जालना एज्युकेशन फाउंडेशन ची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती प्रा. सुरेश लाहोटी यांनी दिली. एकूणच या संस्थेचे काम आणि शिष्यवृत्ती वाटपासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योजक सुनीलभाई रायठा यांचीही उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रा. लाहोटी म्हणाले की समाजातीलच दानशूर व्यक्तींकडून ही शिष्यवृत्ती जमा करून त्यांच्या नावानेच संबंधित विद्यार्थ्यांना दिले जाते. यामध्ये विद्यार्थी हा जालना जिल्ह्यातील असावा, त्याच्या पालकाचे उत्पन्न वार्षिक अडीच लाखाच्या आत मध्ये असावे, आणि त्याने विहित गुण संपादन केलेले असावे हे तीनच निकष लावण्यात आले. आहेत त्यामुळे आर्थिक सुबत्ता नसली तरी गुणवत्ता असेल अशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिल्या जाते. केवळ उत्पन्नाच्या प्रमाणपत्रावर विश्वास न ठेवता यासंदर्भात निवड समिती संबंधित विद्यार्थ्यांच्या घराची पाहणी करून निर्णय घेते. दरम्यान यावर्षीपासून ठराविक शिष्यवृत्ती देण्या सोबतच कांही विद्यार्थ्यांचे वर्षभराचे पालकत्वच या संस्थेने स्वीकारले असल्याचे म्हणाले.
“पढो जालना” या उपक्रमांतर्गत ज्या विद्यार्थ्यांना शिकवणी भरण्यासाठी पैसे नाहीत अशा विद्यार्थ्यांना मोफत शिकविण्याची व्यवस्था ही या फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच जालना शहरात विविध ठिकाणी फाउंडेशनच्या वतीने मोफत वर्ग चालवल्या जात असल्याचेही प्रा. लाहोटी यांनी सांगितले.****
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com