महाराजा अग्रसेन फाउंडेशन विद्यार्थ्यांना देणार शिष्यवृत्ती
जालना- उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून महाराजा अग्रसेन फाउंडेशन च्या वतीने विद्यार्थ्यांन”अग्रसेन” शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे .अशी माहिती या फाउंडेशनचे अध्यक्ष प्राचार्य रामलाल अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी या शिष्यवृत्ती निवड समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजी मदन आणि प्रतिभा श्रीपत यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना श्री .अग्रवाल म्हणाले शैक्षणिक वर्ष 2019 पासून दरवर्षी विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते .आतापर्यंत सुमारे 35 विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला आहे .दरवर्षी दोन लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते. यावर्षी देखील एवढ्याच रकमेचे नव्हे तर निवड समितीने याहीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड केली तर ही रक्कम वाढविली जाईल असेही श्री. अग्रवाल यांनी सांगितले. दरम्यान ही शिष्यवृत्ती फक्त जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठीच असल्याचेही ते म्हणाले. शिष्यवृत्ती मिळण्यासाठी आवश्यक असणारा अर्ज महाराजा अग्रसेन फाउंडेशन, जे.इ.एस. महाविद्यालयासमोर उपलब्ध आहे. रोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान हा अर्ज दिला जाणार असून दिनांक 7 जानेवारी पर्यंत विहित नमुन्यात सर्व कागदपत्र जोडून सादर करावेत असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com