जरांगे पाटलांची कुठे आहे सभा? कुठे आहे वाहनतळ? कुठून येतील वाहने ?कशी जातील वाहने ?इतर वाहनांची व्यवस्था काय? सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा पोलीस प्रशासनाचा हा सुंदर व्हिडिओ
जालना-मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरू असलेला मराठा समाजाचा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे .गेल्या अनेक वर्षांपासून मनोज जरांगे पाटील हे या आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व करत आहेत .त्यांच्या या प्रयत्नांना आता यश येताना दिसत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून राज्याच्या विविध भागात सभा घेऊन आता ज्या ठिकाणाहून मराठा आरक्षणाची ठिणगी राज्यभर पेटली त्या घनसांवगी तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे शनिवार दिनांक 14 रोजी मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी राज्यभरातून येणारा मराठा समाजाची संख्या लक्षणीय राहणार आहे ,आणि त्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. यामध्ये सर्वात जास्त अडचण ठरणार होती ती म्हणजे बाहेर गावाहून येणाऱ्या वाहनांच्या वाहन व्यवस्थेची! कुठे आहे वाहनतळ? वाहने कुठून येतील? कुठे होणार आहे सभा ?सभेसाठी येणाऱ्या वाहना व्यतिरिक्त जी नियमित वाहने आहेत किंवा अन्य नागरिकांची वाहने आहेत ती कोणत्या रस्त्याने वळविण्यात आले आहेत? या सर्व बाबींचा समावेश असलेला एक सुंदर व्हिडिओ पोलीस प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आला आहे. यामध्ये सर्व काही सुस्पष्टपणे सांगण्यात आले आहे .निश्चितच पोलीस प्रशासनाच्या या तयारीचा नकाशा प्रत्येकाला फायदाच होईल. हा नकाशा पहावा आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
edtv jalna news App on play store,
web-www.edtvjalna.com: yt-edtvjalna,
-दिलीप पोहनेरकर,9422219172