बापरे! किती आहे कोचिंग क्लासेस चा टर्नओव्हर; MKCL चे मुख्य सल्लागार विवेक सावंत यांच्याकडून
जालना-शिक्षणात बदल करायचा असेल तर आधी परीक्षेत बदल करावा लागेल, त्यासोबत सध्या कोचिंग क्लासेस चा टर्न ओव्हर हा भारताच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयापेक्षा जास्त आहे. अशी धक्कादाय माहिती एमकेसीएल(MKCL) म्हणजेच महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित चे मुख्य सल्लागार विवेक सावंत यांनी दिली. नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात ते बोलत होते.
जे. इ. एस. महाविद्यालयात शुक्रवार दिनांक 10 रोजी हा परिसंवाद पार पडला. या परिसंवादाला संस्थेचे सचिव श्रीनिवास भक्कड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश अग्निहोत्री, एम. के. सी. एल. चे अमित रानडे, बालकृष्ण बलदवा यांच्यासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या महाविद्यालयातील प्राध्यापक आणि शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
नवीन शैक्षणिक धोरणाविषयी आपले सुस्पष्ट आणि परखड विचार श्री. सावंत यांनी व्यक्त केले, जे संस्थाचालक आणि शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे आहेत. अंतिम परीक्षेलाच आपण अवास्तव महत्त्व दिल्यामुळे आज आपल्या शिक्षणाची ही दुर्दशा झाली आहे असे मत व्यक्त करत, कोचिंग क्लासेस इंडस्ट्री उभी राहिले आहे त्याला कारणीभूत देखील आपणच आहोत असेही ते म्हणाले.दरम्यान त्यांनी परिसंवादात मांडलेले विचार हे शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचविण्याचा EDTV चा हा प्रयत्न. या परिसंवादाचे प्रा.डॉ.लक्ष्मीकांत शिंदे आणि प्रा.डॉ.यशवंत सोनुने यांनी आयोजन केले होते.
कोण आहेत विवेक सावंत
महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य सल्लागार म्हणून विवेक सावंत हे कार्यरत आहेत. डिजिटल युनिव्हर्सिटी या लोकप्रिय ब्रँडसह भारतातील अनेक राज्यांमध्ये तसेच परदेशातील दोन कोटी पेक्षा जास्त लोकांना डिजिटल सक्षमीकरणाच्या सेवा दिल्या आहेत. C-DAC येथे भारतीय पहिला सुपर परम संगणक डिझाईन आणि विकसित करण्यात त्यांचा प्रमुख सहभाग आहे. भारतीय पंतप्रधान आयटी टास्क फोर्स नॅशनल रुरल रोड डेव्हलपमेंट कमिटी आणि राज्य सरकारचे स्टेट ई गव्हर्नर्स टास्क फोर्स इत्यादींसह राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक धोरण निर्धारित समित्यांवर त्यांनी काम केले आहे. अनेक विद्यापीठांच्या अभ्यास मंडळावर आणि शैक्षणिक परिषदांवर त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र अकादमी ऑफ सायन्स चे ते मानद फेलो आहेत. शालेय शिक्षण नाशिक येथून घेतल्यानंतर पुणे येथून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. 1979 ते 87 ते पुणे येथील फरगुशन महाविद्यालयात भौतिकशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक शाखेचे अध्यापक होते. 1988 ते 2000 दरम्यान त्यांनी C-DAC मध्ये परम संगणक डिझाईन केले.
दिलीप पोहनेरकर
9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com