खबरदार पत्नीचा खून कराल तर; होतील एवढ्या शिक्षा
जालना दि. 17 पत्नीला मारहाण करून तिच्या खून करणाऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तसेच 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. हा दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. दिनांक 3 मार्च 2021 रोजी भोकरदन तालुक्यातील हनुमंत खेडा येथे हा खून झाला होता. इतर कलमांसाठी वेगळी शिक्षा सुनावली आहे.
जिल्हा व सत्र न्यायाधीश 3, जालना .श्री.एस. आर.तांबोळी यांनी आरोपी मनोहर पाटीलबा भोपळे , वय 42 वर्षे, राहणार हनुमंत खेडा ,तालुका जाफराबाद ,जिल्हा जालना या आरोपीस पत्नीचा खून केल्याप्रकरणी कलम 302 भादवी मध्ये जन्मठेपेची शिक्षा व वीस हजार रुपये दंड. 302 भादवी मध्ये जन्मठेपेची शिक्षा व वीस हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिने साधा कारावास ,कलम 201 भादवीमध्ये 2 वर्षाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्याच्या सध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड.दीपक नारायणराव कोल्हे यांनी काम पाहिले. .. घटनेची हकीकत अशी की, दिनांक 3 एप्रिल 2021रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सुमारास आरोपी मनोहर भोपळे याने त्याची पत्नी अनिताबाई भोपळे रा.हनुमंत खेडा हीच्या चारित्र्यावर संशय घेऊन, तिला हनुमंत खेडा गावठाणातील टीन पत्राच्या गोठ्यातील अँगलला तिची केसाची वेणी गुंडाळून, खाली पाडून ,त्याच्या हातातील लोखंडी धारदार कोयत्याने मयत हीच्या पोटावर चार ते पाच जबर वार करून गंभीर जखमी केले. तसेच जखमी अवस्थेत त्याच्या गोठ्या मागील हनुमंत खेडा शिवारात गट नंबर 288 मधील बबन त्र्यंबक भोपळे यांच्या शेतातील विहिरीत काठावरून पाण्यात टाकून देऊन तिचा खून केला. तसेच गुन्ह्याच्या वेळी त्याच्या अंगावरील असलेले कपडे कुठेतरी विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केला. म्हणून प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, आरोपी व मयत यांचा मुलगा नामे सतीष मनोहर भोपळे याच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध खून केला म्हणून पोलीस स्टेशन टेंभुर्णी येथे गुन्हा क्रमांक 55 /2021 ,कलम 302, 201 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल होता.संपूर्ण तपास झाल्यानंतर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले…. सरकार पक्षातर्फे या प्रकरणात एकूण पंधरा साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये प्रत्येक्षदर्शी साक्षीदार ,फिर्यादी सतीश मनोहर भोपळे ,घटनास्थळ पंच जगदेव चव्हाण, जप्ती पंच दत्तात्रय चव्हाण ,साक्षीदार कलाम शेख, निवेदनपंच कृष्णा छडीदार, होड़ीवाला लिंबाजी गायकवाड, मरणोत्तर पंचनामा पंच, जप्ती पंच रेखा धनवई, पोहणारा मिलिंद छडीदार, साक्षीदार नंदाबाई गायकवाड , पोलीस ठाणे अधिकारी ज्ञानेश्वर साखले ,पीएम करणारे डॉ. अमोल वाघ, विहिरीचे मालक बबन भोपळे ,मुद्देमाल कॅरियर पोलीस भास्कर जाधव, फोटो व्हिडिओ काढणारे पोलीस गजेंद्र भुतेकर व तपासणीक अमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन पोलीस स्टेशन टेंभुर्णी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या ,तसेच सीए रिपोर्टही सरकार पक्षास सपोर्ट करणारा होता . आरोपीच्या कपड्यावरती मयताचे रक्त आढळून आले. न्यायालयाने सरकार पक्षातर्फे आलेला साक्षीपुरावा व दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन वरील निकाल दिला. कोर्ट पैरवी व जिल्हा सरकारी वकील कार्यातील कर्मचारी यांनी मदत केली.
ताज्या बातम्या पाहण्यासाठी http://www.edtvjalna.com https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv दिलीप पोहनेरकर,9422219172