मुलगी हरवल्याची वडिलांनी दिली तक्रार : मुलीने केला वडिलांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल
जालना- जालना तालुक्यातील गोंदेगाव येथील एक 21 वर्षीय तरुणी हरवल्याची तक्रार तिच्या वडिलांनी रविवार दिनांक 3 मार्च रोजी तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान या मुलीने प्रियकरा सोबत जाऊन लग्न केले आणि आज याच पोलीस ठाण्यामध्ये मुलीने वडिलांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा नोंद केला आहे.
जालना तालुक्यातील गोंदेगाव येथील एका 21 वर्षीय तरुणीचे गावातील त्यात समाजाच्या 26 वर्षाच्या तरुणावर प्रेम जडले. घरच्यांना देखील हे माहीत होते परंतु घरच्यांचा विरोध असल्यामुळे हे लग्न झाले नाही. दरम्यान दोन मार्चला ही जोडी गावातून गायब झाली, आणि तीन मार्चला या तरुणीच्या वडिलांनी तालुका पोलीस ठाण्यामध्ये मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली. तक्रार नोंदविताच पोलिसांचा तपास सुरू झाला. गावातीलच एका मुलासोबत तरुणी गायब झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. दरम्यान पोलिसांचा तपास सुरू असतानाच आज मंगळवार दिनांक सहा रोजी ही मुलगी आणि तरुण तालुका पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले. यावेळी मुलीचे वडीलही तालुका पोलीस ठाण्यात आले होते. वडिलांनी मुलीची समजावून काढण्याचा प्रयत्न केला आणि घरीही घेऊन जाण्यासाठी आग्रह धरू लागले परंतु झाले उलटेच. मुलगी सज्ञान असल्यामुळे मुलीने तालुका पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा नोंद केला असून वडील आपल्याला बळजबरीने घरी नेण्यासाठी आग्रह करीत असून न आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे. तसेच आम्ही दोघांनी पुण्याजवळ एका तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाऊन विवाह केल्याचेही मुलीने या तक्रारीत नोंद केली आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172