पशुधनाचे आधार कार्ड काढले का? एक जून नंतर वाढतील समस्या
जालना- पशुसंवर्धन विभागाने आता जनावरांसाठी देखील इयर टॅगिंग( कानात बिल्ले मारणे )म्हणजेच जनावरांचे आधार कार्ड काढणे बंधनकारक केले आहे. अन्यथा शासनाच्या अनेक योजनांना तर मुकावे लागेल. सोबतच अशा पशुधनाची वाहतूक करणाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अरुण देशपांडे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुयश तांगडे यांनी दिली आहे.
शासनाने एक जून नंतर प्रत्येक जनावराला बिल्ला मारणे बंधनकारक केले आहे. त्या अनुषंगाने बाजार समितीच्या आवारात जनावरांची खरेदी विक्री करताना हा बिल्ला आवश्यक आहे. बिल्ला नसेल तर कोणत्याही जनावराची खरेदी विक्री होणार नाही. तसेच केंद्र शासनाच्या- राज्य शासनाच्या कोणत्याही सुविधा बिल्ला नसलेल्या पशुधनाला मिळणार नाहीत. म्हणजेच भविष्यात जर जनावरांसाठी छावणी असेल, चाऱ्याची व्यवस्था असेल एवढेच नव्हे तर कुठल्याही प्रकारचे लसीकरण किंवा पशुचिकित्सालयात जर अशा जनावरांना तपासायचे असेल तर त्यासाठी कानात बिल्ला असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय त्याच्यावर उपचारही केले जाणार नाहीत. या बिल्लामध्ये जनावरांच्या मालकी हक्काचा देखील उल्लेख असणार आहे. त्यामुळे अनेक वेळा जनावरांना चरण्यासाठी रस्त्यावर सोडून दिल्या जाते, ही जनावरे कोणाची आहेत? हे देखील आता या बिल्लामुळे समजणार आहे आणि संबंधित पशु मालकावर कारवाई करणे देखील सोपे होणार आहे. त्यामुळे हे एक प्रकारचे जनावरचे आधार कार्ड आहे.
इथे करा नोंदणी जालना जिल्ह्यामध्ये एकूण 105 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत या प्रत्येक दवाखान्यामध्ये पशुधनाची नोंदणी केल्या जात आहे. तसेच ऑनलाइन भारत पशुधन प्रणालीवर देखील पशुधनाच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे .त्यासोबत गावात येणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांना भेटून देखील लसीकरण शिबिराच्या माध्यमातून टॅग लावून घेता येऊ शकतो. हा 12 अंकी टॅग आहे तो हरवल्यास पुन्हा त्याची नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे .तसेच ज्या जनावरांच्या कानाला टॅग म्हणजेच बिल्ला नसेल त्या जनावरांची वाहतूक केली तर त्याच्यावर कारवाई होणार आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172