Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

DPDC च्या बैठकीत हे चाललंय तरी काय?कँडी क्रेश गेम,रिल्स, व्हाट्सअप,आणि चवदार फराळाची नासाडी…!

जालना- जिल्हा नियोजन विकास समितीची(DPDC) बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडते. मागील बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयांचा आढावा आणि पुढे नियोजित असलेले निर्णय यासाठी ही बैठक आयोजित केले जाते. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदारांना निमंत्रित केले जाते आणि एकंदरीत सर्व आढावा घेतल्या जातो. सध्या पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये ही बैठक पार पडली.

या बैठकीला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचीही उपस्थिती होती ,तसेच सर्व आमदार देखील उपस्थित होते. सभागृहामध्ये अवघ्या दोनच तासात ही बैठक आटोपती घेण्यात आली. या दोन तासांमध्ये देखील सभागृहामध्ये चाललेल्या गंमती-जमती हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. जालना जिल्ह्याच्या विकासासंदर्भात या बैठकीत निर्णय घेतल्या जातात परंतु याबाबतीत अधिकारी मात्र गंभीर नसल्याचे पाहायला मिळाले आहे. सभागृहामध्ये कोणी कॅंडी क्रश गेम खेळण्यात मग्न होते तर कोणी रिल्स पाहण्यात मग्न होते, कोणी whatsapp वर उत्तर देण्यात मग्न होते आणि जे कोणी उरले आहेत ते चकली, शेव ,लाडू याचा आस्वाद घेण्यात मग्न होते. मग विकास कामांवर चर्चा झाली काय आणि नाही काय , याविषयी कोणालाच काही देणेघेणे नाही. अशा प्रकारच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही बैठक पार पडली.

बैठक म्हटले की चहा- पान फराळ आलाच !मग ती बैठक किती वेळासाठी आहे याचा काही संबंध नाही. दोन तासांच्या बैठकीसाठी चकली ,लाडू ,शेव, अशा चवदार फराळाचे आयोजन करण्यात आले होते. ताटात भरभरून दिलेले हे फराळ अधिकाऱ्यांनी,लोकप्रतिनिधींनी देखील भरभरून ताटात टाकून दिले. त्यामुळे एकीकडे सामान्य जनता रेशनच्या दुकानावर गहू तांदळासाठी रांग लावत असतानाच दुसरीकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी अन्नाची केलेली ही नासाडी अनेकांच्या जीवाला चटका लावून गेली आहे. जिल्ह्याच्या विकासासंदर्भात होत असलेल्या या सभागृहात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अधिकाऱ्यांचे लोकप्रतिनिधी काय सांगतात याकडेच दुर्लक्ष असेल तर सामान्य जनतेच्या कामाचे काय?

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button