जालना- प्रभू श्रीरामांच्या आयोध्यातील मंदिरामध्ये झालेल्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त आणि लवकरच येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आनंदाच्या शिधा वाटपाला प्रारंभ झाला आहे.
दिनांक 22 जानेवारी रोजी अयोध्ये मध्ये श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्याच दिवशी शासनाच्या वतीने स्वस्त धान्य दुकानांमध्ये शिधावाटपालाही सुरुवात झाली. जालना जिल्ह्यातील शिधा वाटपाची पहिली सुरुवात जालना शहरात असलेल्या दुकान नंबर 39 येथून जालनाच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार यांच्या हस्ते करण्यात आली. रेल्वे कर्मचारी संघटनेचे हे स्वस्त धान्य दुकान आहे आणि मनीत कक्कड हे याचे संचालक आहेत. शंभर रुपये किट याप्रमाणे शिधापत्रिकाधारकांना हे साहित्य मिळणार आहे. या साहित्यामध्ये एक लिटर तेल, एक किलो साखर, आणि प्रत्येकी अर्धा किलो मैदा, पोहे, रवा, चणाडाळ अशा एकूण सहा वस्तूंचा समावेश आहे. उद्घाटनाच्या वेळी नायब तहसीलदार श्रीमती मोरे विजयकुमार पंडित मंजीत कक्कड आदींची उपस्थिती होती.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172