आता जनशताब्दी हिंगोली वरून
जालना -जालनेकारांसाठी सुरू झालेली जनशताब्दी आता हिंगोलीकरांची होणार आहे .जालना -छत्रपती शिवाजी टर्मिनस ही रेल्वे सुरुवातीला जालना इथून सुटत होती आणि पहाटे पाच वाजेच्या सुमारास निघून एक वाजेच्या सुमारास मुंबईला पोहोचत होती.
परतीच्या प्रवासात तीच दुपारी चार वाजेच्या सुमारास निघून रात्री नऊ वाजता जालन्याला पोहोचत होती .मात्र कोविड नंतर या रेल्वेचे वेळापत्रकात बदल झाला. तशी ती थोडी गैरसोयीची पण झाली. परंतु आता हीच रेल्वे हिंगोली येथून सुटणार आहे हिंगोली, वसमत ,पूर्णा, परभणी जालना असा मार्ग राहणार आहे. जालन्याचे वेळापत्रक देखील तेच आहे. जालना येथून या रेल्वेसाठी सुमारे 1000 प्रवाशांचा कोठा होता परंतु आता ही रेल्वे हिंगोलीवरून सुटत असल्यामुळे निश्चितच हा कोठा कमी होण्याची शक्यता आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172