आजपासून भादवी(IPC) बंद
मुंबई- देशामध्ये कालपर्यंत भादवी म्हणजेच भारतीय दंड विधान दंड संहिता लागू होती. परंतु आज दिनांक एक जुलैपासून देशामध्ये या कायद्यांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यांची नावेही बदलण्यात आली आहेत. या संदर्भात त्या- त्या राज्याने आपापल्या भाषेमध्ये या कायद्याचे भाषांतर करून संबंधित यंत्रणेला माहितीसाठी उपलब्ध करून दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांनी या पुस्तिकेची प्रस्तावना केली आहे. मराठी मध्ये असलेल्या या पुस्तिकेमध्ये 96 पाने आहेत. राज्याचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी ही पुस्तिका जारी केली आहे. नवीन नावांमध्ये झालेले बदल असे. भादवि दंड संहिता 1860 ऐवजी भारतीय न्याय संहिता 2023, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 ऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 ,भारतीय पुरावा कायदा 1872 च्या ऐवजी भारतीय साक्ष अधिनियम 2023. असे नावही बदलण्यात आले आहे आणि अनेक कायद्याचे कलम देखील बदलण्यात आले आहेत. त्यामुळे आता या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच अधिकारी, कर्मचारी, व्यवसायिकांना या नवीन फौजदारी कायद्यांचा अभ्यास करावा लागणार आहे. सर्वांना परिचित असलेला खुुुनासाखीचा भादवि कलम 302 यासाठी आता भारतीय दंड संहिता 103 तर फसवा फसवी म्हणजे कलम 420 साठी आता भारतीय न्याय संहिता 316 नुसार कारवाई केली जाणार आहे. या न्याय संहितेमध्ये देखील अनेक उपक्रम आहेत ज्याचा बारकाईने अभ्यास करावा लागणार आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172