Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » …ते एक कोटी गेले कुठे? माजी नगराध्यक्षांचा आयुक्तांना सवाल
    Jalna District

    …ते एक कोटी गेले कुठे? माजी नगराध्यक्षांचा आयुक्तांना सवाल

    EdTvBy EdTvJuly 29, 2024No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- ते एक कोटी रुपये गेले कुठे? असा प्रश्न जालना नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी जालना शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना केला आहे.

    जालना शहरातील विविध समस्या संदर्भात माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांनी आज मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांची भेट घेतली, फक्त भेटच घेतली नाही तर आयुक्त उपस्थित नसल्यामुळे त्यांनी आयुक्तांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलनही केले .या भेटीमध्ये महत्त्वाचे मुद्दे मांडले ते त्यांच्या काळात आणलेल्या विकास निधीचा आणि या विकास निधीमधून अर्धवट राहिलेल्या कामांचे. एका मोठ्या निधीचे आणि महत्त्वाचे काम होतं ते म्हणजे सभागृहाचं!. छत्रपती संभाजी उद्यानासमोर त्यावेळी जालना पालिकेचे विश्रामगृह होते जे आज अतिक्रमणाने वेढलेले आहे .खरं तर या विश्रामगृहाच्या मागेच आयुक्तांचे निवासस्थानही आहे अशा महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजेच विश्रामगृहासमोर एक सभागृह बांधण्यासाठी सन 2005 मध्ये त्यावेळी एक कोटी रुपये म्हणजे आजचे पाच कोटी रुपये ग्राह्य धरले जाऊ शकतात. अशाप्रकारे तो एक कोटी रुपयांचा निधी जालना नगरपालिकेला मिळालेला होता आणि आज 19 वर्षानंतर आजही तिथे त्यावेळेसचा जेवढा पाया होता तेवढाच पाया बांधलेला  आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या संतापलेल्या आंबेकरांनी तो एक कोटी रुपयांचा निधी गेला कुठे असा  सवाल उभा केला आहे.

    यासोबतच इतर कामांकडे लक्ष वेधत असताना सतरा वर्षांपासून बीओटी तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या महात्मा फुले व्यापारी संकुलाची निवेदन निघूनही पुढे त्याचे काय झाले? शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी जालना शहराच्या बाहेर घनकचरा प्रकल्प उभारण्याला त्यावेळी सुरुवात झाली होती आणि मशनरी ही खरेदी करण्यात आली होती. मात्र अजूनही तो प्रकल्प कार्यान्वित झाला नाही .जालनेकरांसाठी मोती बागेच्या बाजूला असलेला एकमेव स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव गेल्या दहा वर्षांपासून बंदच आहे. उद्यानाचा खर्च भागविणारा छत्रपती संभाजी उद्यानातील मुलांसाठीची झुक झुक रेल्वे आणि शहरातील नागरिकांसाठी नयनरम्य असणारे कारंजी आजही बंद आहेत. शहराचे सांस्कृतिक वैभव असलेले मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह सन 2005 मध्ये लाखो रुपये खर्च करून नवनिर्मित करण्यात आले, परंतु गेल्या दहा वर्षांपासून ते मृताअवस्थेत आहे. त्यामुळे जालना शहरात साहित्यिकांचा, नाट्य रसिकांचा आणि कलावंतांचा कोंडमारा होत आहे. यासोबतच शहरातील मोकाट जनावरे, आरक्षित असलेल्या जमिनी, पथदिवे अशा सार्वजनिक समस्यांकडे भास्कर आंबेकर यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले.

    https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    App on play store,yt-edtvjalna
    –www.edtvjalna.com
    https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
    -दिलीप पोहनेरकर,9422219172

    जालना शहर महानगरपालिका मनपा आयुक्त संतोष खांडेकर माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर शिवसेना स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव सभागृह मा कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleज्ञानराधा- कुटेच्या अडचणीत वाढ,पोलिसांनी केली बारा मालवाहू वाहने जप्त; जप्तीची कारवाई अजूनही सुरूच!
    Next Article हिंगोली-पुणे बस आणि ब्रेंझा चा अपघात; 18जण जखमी; सीट बेल्ट मुळे वाचले तिघांचे प्राण
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    June 7, 2025

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    June 7, 2025

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    June 6, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,010 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,176 Views

    तयार राहायला सांगितले, परंतु बोलावलेच नाही -माजी सैनिकाला खंत!

    May 18, 2025721 Views

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    June 7, 2025529 Views
    Don't Miss
    Breaking News June 7, 2025

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    जालना – जुना जालना भागातील अंबड चौफुली भागात असलेल्या तुलसी पार्क येथून आयुष संजय चोपडे…

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    पर्यावरण दिन; बिजोत्सव आणि जिल्हाधिकारी…

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आपण याला पाहिलंत का? आयुष संजय चोपडे

    आमच्या पक्षाचे आम्ही बघू, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा! विरोधी पक्षनेते दानवे यांनी दिले माजी आ. गोरंट्याल यांना सडेतोड उत्तर!

    बकरीईद; 25 डॉक्टर आणि चार एस आर. पी. (SRPF)च्या तुकड्या तैनात

    Most Popular

    धुणे धुण्यासाठी विहीरीवर गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू ;बदनापूर तालुक्यातील घटना

    April 24, 20210 Views

    18 ते 44 वयोगटातील लसीकरण लांबण्याच्या मार्गावर

    April 25, 20210 Views

    ऑटो अंबुलन्स मुळे कोरोना बाधित रुग्णांना मिळणार दिलासा; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उपक्रम

    April 26, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.