जालना- भोकरदन येथे दिनांक सात जुलै रोजी मारलेल्या छाप्यामध्ये डॉक्टर दिलीप सिंग राजपूत हे अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदान करत असल्याचे समोर आले होते. त्यावेळेस पासून डॉक्टर राजपूत हा फरार होता. गेल्या 45 दिवसांपासून पोलिसांना झुंगारा देत ते इतर ठिकाणी फिरत होते आणि पोलीस देखील वेगवेगळ्या पद्धतीने तपास करत होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे हे प्रकरण आल्यानंतर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून काल दिनांक 22 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास डॉ. राजपूत याला जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या पळसखेडा मिरची या गावच्या शिवारातून रात्री साडेआठ वाजता ताब्यात घेतले आहे. याविषयी सविस्तर माहिती दिली आहे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी
गेल्या 45 दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी तपास करत होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या टीम मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, शांतीलाल चव्हाण, कृष्णा तंगे, प्रशांत लोखंडे, सागर बाविस्कर ,धीरज भोसले, योगेश सहाने, रमेश पैठणे, सौरभ मुळे, कांबळे यांनी हा तपास लावला.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172