जालना- “छत्रपती संभाजीनगर विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2025” ला शुक्रवार दिनांक 14 पासून जालन्यात सुरुवात झाली आहे .महसूल, ग्रामविकास व पंचायत राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते या स्पर्धांना सुरुवात झाली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्वच जिल्ह्याच्या संघांनी पथसंचलन केले. या पतसंचलनाचे परीक्षण राज्य राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी केले आणि जाहीर महसूल मंत्री योगेश कदम यांनी केला. त्यानुसार जालना जिल्हा पथसंचलनामध्ये अव्वल आलेला आहे तर गुणानुक्रमे द्वितीय क्रमांकावर छत्रपती संभाजी नगर आणि तृतीय क्रमांक नांदेड या जिल्ह्यांनी पटकावला. आजच्या पथसंंचालनाच वैशिष्ट्य म्हणजे आठ जिल्ह्यांपैकी सात जिल्ह्यांच्या संघाचे नेतृत्व हे महिलांनी केला आहे.
निकाल जाहीर होताच संबंधित जिल्ह्यांनी तर जल्लोष साजरा केलाच परंतु इतर जिल्ह्यांनी देखील या आनंद उत्सवामध्ये भाग घेत ढोल ताशाच्या गजरात जल्लोष साजरा केला. विशेष बाब म्हणजे अन्य वेळी अधिकाऱ्यांपासून दूर राहणारे कर्मचारी किंवा कर्मचाऱ्यांपासून दूर राहणारे अधिकारी यावेळी एकत्र येऊन आनंद उत्सव साजरा करताना दिसले. त्यामध्ये विशेष भाग होता तो जालना जिल्ह्याच्या जिल्हा अपर जिल्हाधिकारी रिता मेतरेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर आणि तहसीलदार छाया पवार यांनी खेळलेली फुगडी.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
-दिलीप पोहनेरकर-9422219172