जालना- परतुर तालुक्यातील अकोली हे जेमतेम 1000 लोक वस्तीचे गाव. परंतु इथे झालेल्या विकास कामांच्या निधीचा जर आकडा पाहिला तर विचार करायला लावणार आहे .मागील पाच वर्षांमध्ये या गावात तब्बल 23 कोटींची विकास कामे झाल्याचा दावा गावातीलच काही नागरिकांनी केला आहे .परंतु ही कामे केवळ कागदोपत्री झाली आहेत असा आरोप करत सोमवार दिनांक 17 पासून जालना जिल्हा परिषदेसमोर पाच ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे. याउलट गावातील विकास कामांबद्दल तत्कालीन जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी कौतुक केल्याचे मत या गावच्या ग्रामपंचायतचे प्रवक्ता तथा ग्रामपंचायत च्या महिला सरपंचाचे नातेवाईक तुकाराम सोळंके यांनी केला आहे.
हजार लोक वस्तीमध्ये जर 23 कोटींची विकास कामे होत असतील तर निश्चितच हे गाव पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी यावं आणि या गावापासून प्रेरणा घ्यावी असे वाटले तर निश्चितच यामध्ये चुकीचे काही नाही. परंतु उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांनी केलेले आरोप जर लक्षात घेतले तर या आरोपानुसार, मातोश्री पानंद रस्ते तीन कोटी रुपये, नाला पुनर्जीवन 56 लाख 82 हजार रुपये, रेन वॉटर हार्वेस्टिंग एक लाख 90 हजार रुपये, सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक दोन कोटी वीस लाख रुपये, भूमिगत गटार 30 लाख रुपये, वैयक्तिक लाभ शेततळे दीड कोटी रुपये, सिंचन विहिरी वैयक्तिक लाभ तीन कोटी रुपये, 15 वा वित्त आयोग 40 लाख रुपये आणि जन सुविधा अंतर्गत सिमेंट रस्ते 30 लाख रुपये असे सुमारे 23 कोटी 65 लाख रुपयांची कामे कागदपत्रे झाल्याचा आरोप उपोषणार्थ्यांनी केला आहे. दरम्यान उपोषणार्थ्यांनी केलेला हा गंभीर आरोप खरा वाटात नाही म्हणून www.edtvjalna.com चे प्रतिनिधी अकोली या गावी पोहोचले आणि तिथे काय दिसलं याचं चित्रीकरण वरील व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता. दरम्यान यासंदर्भात ग्रामपंचायतचे प्रवक्ते तुकाराम सोळंके यांनी सांगितले की गावामध्ये झालेल्या विकास कामांबद्दल शेतकरी समाधानी आहेत आणि कसलाही भ्रष्टाचार इथे झालेला नाही. उलट गावातील डिजिटल अंगणवाडीला तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी भेट देऊन पाहणी केली आणि कौतुकच केले आहे. तसेच उपोषणाला बसलेले नागरिक हे “चोरांच्या उलट्या बोंबा” या म्हणीप्रमाणे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी www.edtvjalna.com,आपण प्ले स्टोअर वरून edtvjalna हे ॲप डाऊनलोड करू शकता किंवा आमच्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप चैनल वर देखील बातम्या पाहू शकता Dilip Pohnerkar, –9422219172
आपण युट्युब वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.