जालना – जुना जालना भागातील अंबड चौफुली भागात असलेल्या तुलसी पार्क येथून आयुष संजय चोपडे वय सतरा वर्ष 11 महिने आठ दिवस हा हरवला आहे. यासंदर्भात कदीम जालना पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंदही करण्यात आली आहे.
आयुषची आई ममता संजय चोपडे वय 37 वर्ष राहणार तुळशी पार्क. यांनी कदिम जालना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की सोमवार दिनांक 2 रोजी सकाळी साडेअकरा वाजता सुमारास त्या स्वयंपाक करत असताना आयुषला त्याच्या वडिलांसाठी डब्बा घेऊन जाण्याचे सांगितले .दरम्यान तू पोळ्या करून ठेव मी बाहेरून आले की घेऊन जातो असे तो म्हणाला आणि घराच्या बाहेर पडला. त्यानंतर अद्याप पर्यंत तो घरी आलेला नाही. दरम्यान प्राप्त माहितीनुसार दुपारी दीड वाजेच्या सुमारास आयुष हा जालना रेल्वे स्टेशनवर दिसल्याचे सांगण्यात येत आहे आयुष चोपडे चे वर्णन पुढीलप्रमाणे.
पोलीस ठाणे-क़दीम जालना
गुरन 220/25 कलम 137(2)
मिसिंग पर्सन नामे:- आयुष संजय चोपडे वय 17 वर्ष 11 महिने रा.तूलसी पार्क जुना जालना
रंग- गोरा
बांधा- सड़पातळ
हाईट-5.5
चहेरा-गोल
केस-काळे
अंगात-फिकट गुलाबी रंगाची टी शर्ट,काळ्या रंगाची नाईट पॅनट ,पायात चपल
दिनाक-02/06/2025 रोजी 11:30 वा घरुन निघुन गेला आहे रेलवे स्टेशन फोटेज मधे सुमारे 1 ते 1:30 च्या गाडीने मुंबई कड़े गेला आहे.तरी सदर मुला बाबत काही माहिती मिळाल्यास कळवावे.
बाबा गायकवाड
Npc/1464
पोस्टे क़दीम जालना
9960464595
FOLLOW US
https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
follow this link to join whatsApp group
https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
दिलीप पोहनेरकर –९४२२२१९१७२