Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    शेती अनुदान घोटाळा ;महसूल विभागाचे पाप झाकण्यासाठी आमच्या डोक्याला ताप-ग्रामसेवकांमध्ये संताप

    ITI: ” मंगलवाणी”ची अंमलबजावणी सुरू; प्राचार्य उखळीकर पुन्हा जालन्यात; पुढार्‍यांमध्ये धाकधूक?

    आता नाही चालणार शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवसाचा पुळका!

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » शेती अनुदान घोटाळा ;महसूल विभागाचे पाप झाकण्यासाठी आमच्या डोक्याला ताप-ग्रामसेवकांमध्ये संताप
    Breaking News

    शेती अनुदान घोटाळा ;महसूल विभागाचे पाप झाकण्यासाठी आमच्या डोक्याला ताप-ग्रामसेवकांमध्ये संताप

    EdTvBy EdTvJuly 4, 2025No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- शेती विषयक अनुदान वाटप हा पूर्णपणे महसूल विभागाचा विषय आहे. त्यामुळे या अनुदान वाटपाशी ग्रामसेवकांचा काहीच संबंध नाही. असे असतानाही एका सरकारी कर्मचाऱ्याची दुसऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला मदत म्हणून शासनाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी ग्रामसेवकांनी तलाठ्याला मदत केली. खरंतर ग्रामसेवकाचे कार्यक्षेत्र हे गावअंतर्गत असते आणि गावच्या बाहेरचे कार्यक्षेत्र हे महसूल विभागाचे असते आणि शेती अनुदान वाटप हे देखील गावच्या बाहेरच आहे, त्यामुळे त्याच्याशी ग्रामसेवकांचा काहीही संबंध नाही. परंतु अनुदान वाटपात झालेला घोटाळा झाकण्यासाठी आणि “मी नाही त्यात……. “असे म्हणण्यासाठी ग्रामसेवकांवर आरोप केला गेले आहेत. असं मत ग्रामसेवक व्यक्त करीत आहेत. त्यातच जिल्हाधिकाऱ्यांनी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत आत्तापर्यंत 37 ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. यामध्ये पुन्हा आता वाढ झाली आहे आणि आणखी सात ग्रामसेवकांना म्हणजेच एकूण 45 ग्रामसेवकांना या नोटिस बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान पूर्वीच्या 37 ग्रामसेवकांवर 4 कोटी 72 लाख 32 हजार 977 रुपयांचा अपहार केल्याचा आरोप या कारणे दाखवा नोटीस मध्ये करण्यात आला आहे. अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये उघडकीस आलेला हा एकूण घोटाळा 45 कोटींच्या सुमारास आहे.

    दरम्यान ग्रामसेवकांना पुन्हा नोटिसा बजावण्यात आल्यामुळे ग्रामसेवक मंडळी चांगलीच संतापली आहे .2022 च्या अद्यावत याद्या आहेत ,त्यानंतर सर्वांना सरसकट अनुदान देण्याचे ठरलेले आहे. असे असतानाही पुन्हा नव्याने याद्या तयार करण्याची गरजच काय? असा प्रश्न ग्रामसेवकांनी उपस्थित केला आहे. फार झाले तर या दोन वर्षांमध्ये खरेदी -विक्री झालेल्या नवीन व्यवहारांपुरतीच दुरुस्ती करता आली असती. त्याहीपेक्षा पुढे जाऊन जमिनीचे क्षेत्र वाढवणे आणि कमी करणे हे सर्वस्वी तलाठ्याच्या कार्यक्षेत्राची बाब आहे. मग त्याच्याशी ग्रामसेवकाचा संबंधच काय? असे प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. शेती अनुदान वाटपाच्या अद्यावत याद्या या तहसीलदारांच्या स्वाक्षरीने आणि त्यांच्या मेलवरून पुढे जातात त्यापूर्वी तहसीलमध्ये बसलेले अनेक दलालांनी  या याद्यांमध्ये आपल्याला सोयीस्कर असलेली नावे टाकली असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळेच त्यांचे हे उघडे पडलेले पाप झाकण्यासाठीच ग्रामसेवकांच्या डोक्याला ताप दिल्या जात आहे असाही आरोप ही ग्रामसेवक मंडळी करीत आहे.

    दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटिसांना ग्रामसेवकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत खुलासे देखील पाठवले आहेत.  या सर्व खुलासांमध्ये एकाही ग्रामसेवकाने अपहार केला नाही असे सविस्तर पत्रच महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनने दिले आहे.

                         FOLLOW US
    https://youtube.com/@edtvjalna5167(pls subscribe channel)
    https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
    https://www.instagram.com/edtvjalna?utm_source=qr&igsh=MWc3aHd3cW53aWdvZQ==
    https://www.facebook.com/share/1JF6uiMsj5/
    follow this link to join whatsApp group
    https://chat.whatsapp.com/LLzwFQ46sP53ccxTS3XtVa
       *दिलीप पोहनेरकर *   ९४२२२१९१७२

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    # पीक अनुदान घोटाळा # जिल्हाधिकारी जालना# तलाठी# ग्रामसेवक# जिल्हा परिषद जालना#zp jalna#edtv news#jalna live#live news# पिक विमा#
    Share. Facebook WhatsApp
    Previous ArticleITI: ” मंगलवाणी”ची अंमलबजावणी सुरू; प्राचार्य उखळीकर पुन्हा जालन्यात; पुढार्‍यांमध्ये धाकधूक?
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    ITI: ” मंगलवाणी”ची अंमलबजावणी सुरू; प्राचार्य उखळीकर पुन्हा जालन्यात; पुढार्‍यांमध्ये धाकधूक?

    July 4, 2025

    आता नाही चालणार शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवसाचा पुळका!

    July 2, 2025

    प्रेरणादायी मुलाखत; रोमांचक गिर्यारोहणांमधून रोजगार आणि नोकरीच्या संधी- गिर्यारोहक किशोर नावकर यांची माहिती

    July 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,064 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,183 Views

    नोकरीच्या शोधात? एक हजार एकशे जागांमध्ये तुमचा नंबर शंभर टक्के!

    June 21, 2025910 Views

    जालन्यात उद्या पुन्हा रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन!

    June 10, 2025806 Views
    Don't Miss
    Breaking News July 4, 2025

    शेती अनुदान घोटाळा ;महसूल विभागाचे पाप झाकण्यासाठी आमच्या डोक्याला ताप-ग्रामसेवकांमध्ये संताप

    जालना- शेती विषयक अनुदान वाटप हा पूर्णपणे महसूल विभागाचा विषय आहे. त्यामुळे या अनुदान वाटपाशी…

    ITI: ” मंगलवाणी”ची अंमलबजावणी सुरू; प्राचार्य उखळीकर पुन्हा जालन्यात; पुढार्‍यांमध्ये धाकधूक?

    आता नाही चालणार शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवसाचा पुळका!

    प्रेरणादायी मुलाखत; रोमांचक गिर्यारोहणांमधून रोजगार आणि नोकरीच्या संधी- गिर्यारोहक किशोर नावकर यांची माहिती

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    शेती अनुदान घोटाळा ;महसूल विभागाचे पाप झाकण्यासाठी आमच्या डोक्याला ताप-ग्रामसेवकांमध्ये संताप

    ITI: ” मंगलवाणी”ची अंमलबजावणी सुरू; प्राचार्य उखळीकर पुन्हा जालन्यात; पुढार्‍यांमध्ये धाकधूक?

    आता नाही चालणार शासकीय कार्यालयांमध्ये वाढदिवसाचा पुळका!

    Most Popular

    जवसगाव शिवारातून गौण खनिजाचा अवैध उपसा

    April 27, 20210 Views

    शॉटसर्किटने दीड एक्कर ऊस जळून खाक

    April 27, 20210 Views

    माळरानावरील झाडांमध्ये वाऱ्याप्रमाणे पसरली आग; जीवितहानी नाही

    April 27, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.