Close Menu
ED TV News

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    जबाबदार उद्योगाबद्दल जबाबदार उद्योजकाचा सन्मान

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV News
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV News
    You are at:Home » त्याच पुढे काय?GDCC प्रकरण; सौ.खरात यांचा अटकपूर्व जामीन मंजूर;
    Jalna District

    त्याच पुढे काय?GDCC प्रकरण; सौ.खरात यांचा अटकपूर्व जामीन मंजूर;

    EdTvBy EdTv15/04/2023No Comments3 Mins Read1 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    जालना- तालुका पोलीस ठाण्यात 16 जानेवारीला GDCC म्हणजेच ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन च्या व्यवहारा प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. 4 फेब्रुवारीपासून खरा तपास सुरू झाला. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यातही घेतले होते, आणि पुढील पंधरा दिवस याचा तपास वेगामध्ये सुरू होता. परंतु 18 फेब्रुवारी नंतर या तपासातीची गतिमंदावली आरोपींची पोलीस कोठडी संपली आणि न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.

    यादरम्यान फरार असलेले मुख्य आरोपी खरात दांपत्य यांचाही तपास पोलिसांना अद्याप लागलेला नाही. दरम्यान खरात दांपत्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्या पुणे येथील चौघांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. त्यामुळे आता ही लढाई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुरू आहे आणि त्यातील मुख्य आरोपी असलेल्या सौ दीप्ती किराण खरात यांना काल दि.14 रोजी अटकपूर्व जामीन  मंजूर केला आहे. आरोपींना अटक करून तीन महिने होत आले. तपासात प्रगती नसल्यामुळे अजूनही त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल झाले नाही. त्यामुळे भादवि कलम 409 लावून दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आणि त्यामध्ये ते यशस्वी देखील झाले आहेत. त्यामुळे अन्य वेळी 60 दिवसात जे आरोप पत्र दाखल करावे लागते ते आता 90 दिवसात करावे लागणार आहे. पोलीस, न्यायालय आणि आरोपी यांच्यामध्ये ही लढाई सुरू आहे.

    दुसरीकडे ज्या ग्लोबल डिजिटल कॅश कॉईन मुळे एवढा सर्व खटाटोप झाला, त्या कॅश कॉइन ची आज बऱ्यापैकी स्थिती असल्याचे समोर येत आहे. कारण ज्या वेबसाईट आणि प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा सर्व व्यवहार केला जातो ती सर्व यंत्रणा आजही सुरळीत सुरू आहे. 27 जानेवारीला जीडीसीसी एल बँक वर लिस्ट झाला ( एल बँक म्हणजे जिथे या कॉइनची अधिकृत खरेदी विक्री करता येऊ शकते) त्यानंतर बिटमार्ट & कॉइन W ह्या एक्सचेंर्स वर देखील GDC कॉइन चे लिस्टिंग झाले आहे.  तसेच आवश्यक असणारे बाकीचे टप्पे पार करत  ” कॉईन मार्केट कॅप” इथे देखील या जीडीसीसी ची नोंद झाली आहे. त्यामुळे आता या GDCC मधील उलाढाल सुरू आहे . फरक एवढाच आहे की या कॉइन चा भाव कधी कमी होतो तर कधी जास्त होतो .कदाचित हा चढउतार गुंतवणूकदारांच्या लक्षात आल्यामुळेच की काय पहिल्या पंधरा दिवसात जेवढ्या तक्रारी आल्या त्याच्यानंतर पोलिसांकडे तक्रारी येणे बंद झाले आहे. कदाचित या काळामध्ये ज्या गुंतवणूकदारांनी किरकोळ रक्कम गुंतवली आहे त्यांचा परतावा देखील त्यांना मिळाला असावा म्हणून देखील या तक्रारी आल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे.

    गुंतवणूकदारांना हे आहेत पर्याय

    ज्या गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक जीडीसीसी मध्ये केलेली आहे त्यांची गुंतवणूक आजही जशाला तशी आहे. बाजारभावातील चढउतारामुळे गुंतवणूकदारांसमोर तीन पर्याय आहेत पहिला पर्याय म्हणजे जेवढी गुंतवणूक केली होती ती गुंतवणूक आज भाव कमी असो अथवा जास्त ती काढून घेणे. भाव उतरले असतील तर निश्चितच नुकसान होईल परंतु भविष्यामध्ये गुंतवणूक परत मिळेल का? का ? बुडीत खात्यावर टाकावी लागेल! ही टांगती तलवार राहणार नाही.
    दुसरा पर्याय म्हणजे या कॉइनचा ट्रेडिंग रेट वाढला की ते विकून टाका आणि तुम्ही तुमचा पैसा आणि नफा कमवून मोकळे व्हा. तिसरा एक पर्याय आहे तो म्हणजे एव्हरेज करा. सध्या असलेल्या गुंतवणुकीमध्ये आणखी थोडी गुंतवणूक करून वाढलेला भाव आणि मागील झालेले नुकसान एकत्रित करून तिचे ट्रेडिंग करा.या प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना देखील आजही या कॅश कॉइनचे व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी संयम बाळगला तर भविष्यात त्यांची रक्कम परत मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    दिलीप पोहनेरकर
    9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    Eow GDCC आर्थिक गुन्हे शाखा क्रिप्टो करेंसी
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleआपणही या!कुंडलिका व सीना पुनरुज्जीवन अभियान संवाद यात्रा उद्या
    Next Article खा.संजय राऊत म्हणजे मनोरंजनाचा साधन ;ईडी संजय राऊत आणि खोके यापासून दूर राहा-खा. कीर्तिकर यांचा सल्ला
    EdTv
    • Website

    22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

    Related Posts

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    10/02/2026

    जबाबदार उद्योगाबद्दल जबाबदार उद्योजकाचा सन्मान

    07/02/2026

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    22/12/2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    या आहेत जालन्याच्या नूतन जिल्हाधिकारी, श्रीमती अशिमा मित्तल(IAS)

    30/07/20255,086 Views

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    31/05/20254,110 Views

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    10/02/20261,323 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    22/05/20251,248 Views
    Don't Miss
    Breaking News 10/02/2026

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    जालना-गेल्या दोन वर्षांपासून जालना जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपीला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले…

    जबाबदार उद्योगाबद्दल जबाबदार उद्योजकाचा सन्मान

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    सागर धानुरेच्या हत्येची 25 लाखांमध्ये सुपारी, पंधरा दिवसांपूर्वी शिजला कट

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    “या” शाळेमुळे लागला जालना जिल्ह्याला कॉपी मुक्त अभियानात”ढब्बा”

    जबाबदार उद्योगाबद्दल जबाबदार उद्योजकाचा सन्मान

    पत्रकारांना बोलावून काँग्रेस नेत्यांनी घेतला काढता पाय?

    Most Popular

    हे तर राज्य सरकारचे अपयश-आ.लोणीकर

    05/05/20210 Views

    आजी बरंय का! का विभागीय आयुक्तांनी केली आजीबाई च्या तब्येतीची चौकशी

    06/05/20210 Views

    आणखी एका कोरोना संशयिताचे रुग्णालयातून पलायन; रेल्वे पुलाखाली सापडला मृतदेह

    06/05/20210 Views
    © 2026 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.