Close Menu
ED TV

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    वारी.. आत्मपरीक्षणाची, स्वावलंबनाची, प्रेरणा देण्या-घेण्याची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची!

    थेट आषाढी वारी मधून….

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    Facebook X (Twitter) Instagram
    • Reporter
    Facebook Instagram YouTube WhatsApp
    ED TV
    • राज्य
    • जालना जिल्हा
    • दिवाळी अंक 2024
    • दिवाळी 2022
    • Reporter
    Subscribe
    ED TV
    You are at:Home » औरंगाबाद- जालना महामार्गावर पडले मोठमोठे खड्डे
    राज्य

    औरंगाबाद- जालना महामार्गावर पडले मोठमोठे खड्डे

    edtvBy edtvJuly 28, 2021No Comments2 Mins Read0 Views
    Facebook WhatsApp Pinterest Telegram Copy Link
    Share
    Facebook WhatsApp Pinterest LinkedIn Telegram Copy Link

    बदनापूर- कोरोनामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा घेत टोलवेज कंपनीने मान्सूनपूर्व दुरुस्ती न केल्यामुळे जालना-औरंगाबाद महामार्गावर   मोठ मोठे खोल खडडे पडल्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवताना कसरत करावी लागतआहे. वाहतुकीचा जागोजागी खोळंबा होत आहे. मोटारसायकल व छोटया वाहनांना खडडयांचा अंदाज येत नसल्यामुळे छोटे – मोठे अपघात होत आहेत.

    *कमी वाहतूक असतानाही केली नाही दुरुस्ती*

    कोरोना रोगाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून शासनाच्या वतीने दुसऱ्या लाटेनंतर मार्च महिन्याच्या मध्यापासून लॉकडाऊन करण्यात आले होते. त्या दरम्यान महामार्गावर अतिशय कमी वाहतूक होत होती. जालना ते औरंगाबाद हा ६० किलोमीटर लांबीचा रस्त्यावर दोन  ठिकाणी टोल वसूल केला जातो. या रस्त्याची निर्मिती व देखभाल  टोलवेज कंपनीकडूनच करण्यात येते. मात्र. लॉकडाऊनमुळे कमी असलेल्या वाहतुकीचा गैरफायदा सदरील कंपनीने घेऊन मान्सूनपूर्व दुरुस्तीच केलेली नाही. वास्तविक जानेवारीनंतर या रस्त्याचे मान्सूनपूर्व कामे करून मजबुतीकरण, अस्तरीकरण करण्याची आवश्यकता असते. ज्यामुळे पावसाळा सुरू झाल्यानंतरही हा महामार्ग खडडेमुक्त राहत असतो.

    *प्रशासनाचे दुर्लक्ष : टोलवेज कंपनीचा कामचुकारपणा*

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन कोरोनाच्या कामात असल्यामुळे झालेल्या दुर्लक्षाचा या टोलवेज कंपनीने गैरफायदा घेऊन महामार्गाच्या दुरुस्ती कामाकडे दुर्लक्ष केले.  खडडयांचा अंदाज न आल्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहेत तर अनेक चारचाकी गाडयांचे चेंबर फुटून नुकसान होत आहे. जालना-औरंगाबाद टोलवेज कंपनी जालना ते औरंगाबाद या चार पदरी रस्त्यावर नागेवाडी (जालना) व लाडगाव (औरंगाबाद) या दोन ठिकाणी टोल जमा करते. 

    रस्त्यावर पडले मोठमोठे खडडे

     टोलवेज कंपनी खडडे पडल्यानंतर पडलेल्या खडडयात खडी व मुरुमाचा भरणा करून खडडे बुजावण्याचा तोकडा प्रयत्न करते परंतु रिमझीम पावसामुळे या मुरुमामुळे खडडयाच्या बाहेर चिखल होऊन त्याचाही वाहनधारकांना त्रासच होतो.

    * अस्तरीकरण करण्याची मागणी*

    औरंगाबाद ते जालना रस्त्यावर डांबराचा थर मारुन अस्तरीकरण करून संपूर्ण रस्त्याचे नुतनीकरण करून वाहनधारकांचा त्रास थांबवण्याची मागणी होत आहे. मागच्या वर्षीही पावसानंतर या महामार्गावर प्रचंड खडडे पडून दूरवस्था झालेली होती. परंतु तेव्हाही टोलवेज कंपनीने थातूर मातूर काम केल्यामुळे या वर्षी पहिल्याच पावसाने या रस्त्यावर खडयाचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. तसेच थोडाशा पावसातच संपूर्ण रस्ता उखडल्यामुळे या कामाच्या गुणवत्तेविषयी संशय व्यक्त होत असून या रस्त्याचे त्वरित मजबुतीकरण व अस्तरीकरण करण्याची मागणी होत आहे.

    *राजकारण्याचे  दुर्लक्ष : परमेश्वर जऱ्हाड*
    या बाबत बदनापूर येथील सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर जऱ्हाड यांनी तर या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत टोलवेज कंपनी बरोबरच थेट राजकारण्याचे होत असलेले दुर्लक्ष अधोरेखित करून हा हायवे लवकरात लवकर दुरुस्त करावे अशी मागणी केली.

    ताज्या आणि परिपूर्ण बातम्यांसाठी डाउनलोड करा edtv jalna app ॲप

    📢 FOLLOW US

    ▶️ YouTube | 💬 WhatsApp Channel | 📸 Instagram | 📘 Facebook | 👥 WhatsApp Group

    दिलीप पोहनेरकर - ९४२२२१९१७२

    जालना टोल व्हेज कंपनी औरंगाबाद जालना महामार्ग खड्डे
    Share. Facebook WhatsApp
    Previous Articleमित्राच्या लग्ना साठी जाणाऱ्या स्कार्पिओ गाडी ला अपघात; पाच जण जखमी
    Next Article पहिली पास वडिलांची मुलगी होणार डॉक्टर :पी. एफ सी. मध्ये केलं मार्गदर्शन
    edtv

    Related Posts

    खंडणी प्रकरण: आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी; खंडणीच्या पैशातून सोने वाहन आणि कॅमेऱ्याची खरेदी

    June 25, 2025

    शिक्षण संस्था चालकांना काटा काढण्याची धमकी! एकदा खंडणी घेतल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा मागणी

    June 25, 2025

    सातबारा बनावट, पेरा ही बनावट; शासनाला लावला एक कोटीचा चुना

    June 23, 2025

    Comments are closed.

    Advertisment

    [URIS id=12694]

    Advertisment

    [URIS id=12710]

    Demo
    Top Posts

    जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या; कशी होती कारकीर्द?

    May 31, 20254,059 Views

    जालन्याच्या “आकाचा” धनंजय मुंडे करा! धुळे येथे सापडलेल्या पाच कोटींच्या रकमेवरून माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची मागणी

    May 22, 20251,183 Views

    नोकरीच्या शोधात? एक हजार एकशे जागांमध्ये तुमचा नंबर शंभर टक्के!

    June 21, 2025908 Views

    जालन्यात उद्या पुन्हा रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन!

    June 10, 2025804 Views
    Don't Miss
    Breaking News July 1, 2025

    वारी.. आत्मपरीक्षणाची, स्वावलंबनाची, प्रेरणा देण्या-घेण्याची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची!

    जालना- https://youtu.be/Oypqas1EimE?si=3910mOIlPf-vNMdG

    थेट आषाढी वारी मधून….

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    ITI; प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी, परंतु नादुरुस्त इमारतीमुळे त्यांच्या जीवाची हमी घेणार कोण?

    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    Demo
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    वारी.. आत्मपरीक्षणाची, स्वावलंबनाची, प्रेरणा देण्या-घेण्याची सर्वांना सोबत घेऊन चालण्याची!

    थेट आषाढी वारी मधून….

    ना. मंगलप्रभात लोंढा यांची “मंगलवाणी”, आयटीआय(ITI) चे पुनर्जीवन करणार ;तीन महिन्यात सर्व रिक्त जागा भरणार

    Most Popular

    जवसगाव शिवारातून गौण खनिजाचा अवैध उपसा

    April 27, 20210 Views

    शॉटसर्किटने दीड एक्कर ऊस जळून खाक

    April 27, 20210 Views

    माळरानावरील झाडांमध्ये वाऱ्याप्रमाणे पसरली आग; जीवितहानी नाही

    April 27, 20210 Views
    © 2025 EDTV Jalna. Designed by Dizi Global Solution.
    • Home

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.