जालना -घटस्थापनेच्या म्हणजेच रविवार दिनांक 15 रोजी जालन्यातून इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या रेल्वे इंजिन ला सुरुवात होत आहे. उद्या रविवार दिनांक 15 रोजी घटस्थापना आहे आणि सकाळी साडेआठ वाजता जालना ते दादर ही जनशताब्दी एक्सप्रेस पहिल्यांदाच इलेक्ट्रिक इंजिनवर धावणार आहे .आज दिनांक 14 रोजी लोको पायलट बी.के .साळुंखे आणि त्यांचे सहकारी शंतनू काळे या दोघांनी डिझेल इंजिन वरची शेवटची जनशताब्दी मुंबईकडे घेऊन गेले. उद्या लागणारे जनशताब्दी चे इलेक्ट्रिक इंजिन जालना रेल्वे स्थानकात उभे असून सकाळी साडेआठ वाजण्याची वाट पाहत आहे.
edtv news” रणरागिनी 2023″ पहा रविवारपासून रोज सकाळी 7 वा. दहावी पास साठी नवस करणारी कोणती महिला झाली IAS, कोण आहे नवसाची बायको? ….आणि बरंच कांही.
सध्या तरी जनशताब्दी ही एकच रेल्वे इलेक्ट्रिक इंजिनवर धावणार आहे. या इंजिनला इलेक्ट्रिक पॉवर पोहोचविण्यासाठी चिखलठाणा येथून पुरवठा केल्या जाणार आहे आणि जालन्यामध्ये उभ्या केलेल्या वीज उपकेंद्रामधून परतुर पर्यंत वीज पुरवठा दिला जाणार आहे .परतुर पर्यंत केलेल्या वीज पुरवठ्याची चाचणी लवकरच सुरूही होणार आहे. दरम्यान सध्या इलेक्ट्रिकवर चालणारे इंजिन जरी जनशताब्दीला जोडल्या गेले तरी कुठलाही परिणाम प्रवासावर होणार नाही. खरे तर डिझेल इंजिन पेक्षा इलेक्ट्रिक इंजिनची गती ही जास्त आहे आणि लवकर गती घेते परंतु या गतीचा परिणाम वेगवेगळ्या स्टेशनवर पोहोचण्यामध्ये होऊ शकतो. त्यामुळे जोपर्यंत वेळापत्रक बदलत नाही तोपर्यंत आहे त्याच स्थितीमध्ये ही रेल्वे आपल्याला पाहायला मिळणार आहे. या इलेक्ट्रिक रेल्वे इंजिनचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्या होणार आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
web-www.edtvjalna.com
you tube-edtvjalna,App on play store
-दिलीप पोहनेरकर,9422219172