जालना-(दिलीप पोहनेरकर)”दहावी बोर्डाची परीक्षा पास व्हावी म्हणून देवीचे व्रत केले आणि या व्रताच्या दरम्यान मी आईला खूप त्रास दिला. आई वैतागली आणि मला खनकावले, ती म्हणाली” यापुढे तू असे व्रत करू नको” . अशी दिलखुलास कबुली देणारी , दहावी पास होण्यासाठी व्रत करणारी महिला आज भारतीय प्रशासन सेवेमध्ये(IAS) कार्यरत आहे. त्या आहेत जालना जिल्हा परिषदेच्या म्हणजेच मिनी मंत्रालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा विकास मीना. नवरात्रोत्सवानिमित्त”edtv news रणरागिनी 2023″ च्या माळेत पहिले पुष्पगुंपताना त्या बोलत होत्या.

आयुष्याच्या वाटेवर “विकास”चा हात धरून त्या ही जबाबदारी पार पाडत आहेत. पती विकास मीना हे छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत .या विकास वाटेवरील जीवनपट खुला करताना त्या म्हणाल्या “लहानपणी आम्हाला खूप मागणी होती. त्यावेळी घरोघरी कुमारिका म्हणजेच कन्यांना जेवणासाठी बोलावले जायचे आम्ही आठ दहा मैत्रिणी एकत्र असायच्या आणि शेवटी दोन ते तीन रुपये दक्षिणा म्हणून मिळायची . जेवणाच्या बदल्यात फ्रॉक, झगा देण्याची परिस्थिती त्यावेळी नव्हती. परंतु आता ही परिस्थिती राहिलेली नाही .डिजिटल मुळे नवरात्रीच्या उत्सवाचे स्वरूप बदलले आहे, शुभेच्छा देणे घेणे मोबाईलवर, भेटीगाठी व्हिडिओ कॉल वर, खरे तर हे चुकीचे आहे. प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद या डिजिटल मध्ये मिळत नाही. महिला आणि पुरुषांमध्ये आजही भेदभाव आहे. उच्च पदावर गेल्यावर तो कमी होतो परंतु खालच्या पातळीवर हा मोठ्या प्रमाणात आहे. विशेष करून चित्रपट सृष्टी मध्ये हा जास्त पाहायला मिळतो. एका क्षेत्रात अभिनेता अभिनेत्री काम करत असताना अभिनेत्रीला मात्र दुजा भाव दिला जातो. आपण भारतीय लोक खूप नशीबवान आहोत .कारण एका चांगल्या देशात आपण राहतो. आपल्याला समाधानी राहायचे असेल, सुखी व्हायचे असेल तर आपल्या परिस्थितीपेक्षा ज्याची वाईट परिस्थिती आहे त्याच्याकडे बघा म्हणजे तुम्ही समाधानी व्हाल. महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला पाहिजे. एखादी गृहिणी ही फक्त घरच सांभाळते, काही उत्पन्न करत नाही हा मोठा गैरसमज आहे .अशावेळी थोडावेळ विचार केला तर स्वयंपाकाला बाई, घर कामाला बाई, मुले सांभाळण्यासाठी बाई, अशी वेगवेगळी कामे जर इतरांकडून करून घेतली तर तीस ते चाळीस हजार रुपये सहज जातील आणि मुलांवर संस्कारही होणार नाहीत. त्यामुळे गृहिणी ह्या मुलांवर संस्कार करून अप्रत्यक्ष देशसेवाच करत आहेत .महिलांनी स्वबळावर उभे राहिलेच पाहिजे, माझे कर्मचारी मी कडक स्वभावाची आहे असे म्हणतात आणि ते खरंही आहे ,कारण 18 ते 20 हजार कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्यासाठी माझ्यामध्ये ती कठोरता गरजेची आहे.

प्रतिक्रियांसाठी रणरागिणीचा नंबर 7057747523

दहावी पास होण्यासाठी व्रत केले आयएएस होण्यासाठी काय केले? या प्रश्नाला उत्तर देताना सौ. मीना म्हणाल्या “दहावीची परीक्षा देताना ची परिस्थिती वेगळी होती आणि आयएएस झाले त्यावेळेस ची परिस्थिती वेगळी होती. माझी अध्यात्मा बद्दलची संकल्पना वेगळी आहे. त्यामुळे मी मंदिरात जाऊन दर्शन घेत नाही परंतु कुठल्याही शुभकार्यापूर्वी देवाला हात जोडून नमस्कार करते आणि सुबुद्धी मागते. त्यामुळे आयएएस परीक्षेला जाण्यापूर्वी देखील मी हेच केले.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
web-www.edtvjalna.com
you tube-edtvjalna,App on play store
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version