जालना- नोकरी- परिवार, कोर्टकचेऱ्या अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर लढताना ताण-तणाव येतोच, आपण कोलमडून पडतो, अशावेळी वडिलांनी दिलेले संस्कार कामाला येतात. अध्यात्मिक स्वरूपाचे केलेले हे संस्कार महत्त्वाचे आहेत. रोज सकाळी दहा मिनिट ध्यान केले किंवा एखादे स्तोत्र म्हटले तरी दिवसभराचे बळ मिळते. आजच्या परिस्थितीत स्त्रियाला गरज असो अथवा नसो तिने आर्थिक दृष्टीने सुदृढ होण्याची गरज आहे. पैशासाठी नव्हे तर तिने आत्मसन्मानासाठी नोकरी करावी ही काळाची गरज असल्याचे मत औषधी निरीक्षक सौ. वर्षा महाजन यांनी व्यक्त केले आहे. लहानपणी जत्रेमध्ये लालबोडशव खाण्यासाठी वडिलांकडे केलेले हट्ट आजही आठवतात आणि खरे तर ते आज लज्जास्पद वाटत असले तरी मनाला आनंद देऊन जातात असा अनुभव देखील सौ. महाजन यांनी दिलखुलास बोलून दाखवला.Edtv news नवरात्रोत्सव”रणरागिणी 2023″ या मालिकेत आठवे पुष्पगुंपताना त्या बोलत होत्या.
रणरागिणीला प्रतिक्रिया द्या-+91 97672 70368पदुत्तर शिक्षण घेऊन महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून औषधी निरीक्षक या पदी कार्यरत असलेल्या सौ. वर्षा महाजन सांगतात,” घर संसार सांभाळ नोकरी करत असताना तारेवरची कसरत करावी लागते, परंतु कुटुंबाचा भक्कम पाठिंबा असला तर भरारी घेण्यामध्ये कोणतीच अडचण येत नाही. असाच पाठिंबा मला पतींचा मिळाला आहे. माझी बदली होईल तिथे ते स्वतः च्या करिअरचा विचार न करता “तुला जमत नाही ,परंतु मी करून घेतो ” असे म्हणत पाठिंबा देतात. खरंतर नोकरी करत असताना अनेक वेळा कुलधर्म, कुलाचार ,परंपरा पाळण्यासाठी वेळ मिळत नाही आणि ते पाळणे मला आवडते अशा वेळी तडजोड करून समन्वय साधून वेळ काढते आणि हे सर्व आणि आनंद घेण्याचा प्रयत्न करते . नोकरीच्या क्षेत्रामध्ये सर्व सहकारी आणि अधिकारी चांगले मिळाल्यामुळे त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. अधिकारी म्हटलं की लोक वचकतात !त्यामुळे फारशा कांही अडचणी येत नाहीत ,आणि आल्या तरी पोलिसांच्या मदतीने त्या दूर होतात .ताण तणाव दूर करण्यासाठी अध्यात्म हे फार गरजेचे आहे. त्यावर माझी अंधश्रद्धा नाही तर श्रद्धा आहे. रोज दहा मिनिटे केलेले ध्यान किंवा एखादे स्तोत्र म्हटले तर त्यामधून दिवसभर ऊर्जा मिळते असेही सौ.वर्षा म्हणाल्या.
जत्रेतील जुन्या आठवणी सांगताना त्या म्हणाल्या की, मी मूळची नाशिकची. बालपण शिक्षण सर्व काही नाशिकमध्ये झाले आणि त्यावेळी आमच्या घराजवळच कालिंका देवीची यात्रा भरायची. या यात्रेत गेल्यानंतर लाल दिसणारी गोड शेव घेण्यासाठी वडिलांकडे हट्ट करायचे. तो हट्टा आज हास्यास्पद वाटत असला तरी अजून अविस्मरणीय आहे. दुर्दैवाने हा हट्ट पुरवण्यासाठी वडील आज याजगात नाहीत.
पूर्वीही स्त्रीशक्तीचा काळ होता, आजही तो आहे परंतु आता मुली शिकत असल्यामुळे राहणीमहानात फरक पडला आहे. नोकरी आणि काम करणाऱ्या महिलांविषयी आपल्याला खूप आदर आहे, विशेष करून पोलीस प्रशासनातील महिलांचा . परिवाराला आर्थिक उत्पन्नाची गरज असो अथवा नसो स्वावलंबनासाठी ,आत्मसन्मानासाठी महिलांनी सक्षम व्हावे! आपले भविष्य आपले ध्येय गाठण्यासाठी कोणतीही परिस्थिती आडवी येत नाही फक्त आपल्या मनाचा निर्धार असावा लागतो असेही सौ. वर्षा महाजन यांनी सांगितले.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
web-www.edtvjalna.com
you tube-edtvjalna,App on play store
-दिलीप पोहनेरकर,9422219172