जालना -सदर बाजार पोलिसांनी जालना शहरातील दोन संघटित गुन्हेगारांविरुद्ध कारवाई केली आहे .त्यांची जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशान्वये संभाजीनगर येथील हरसुल कारागृहात रवानगी केली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वीच जामीनावर सुटून आलेल्या एका गुन्हेगाराला आणि त्याच्या दोन साथीदारांना तलवारीसह ताब्यात घेतले आहे.

या संदर्भात माहिती देताना सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी सांगितले की, सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळ बाजार परिसरात जातीय दंगल घडविण्यात कारणीभूत असलेले, इतरांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणारे ,तसेच जातीय दंगल घडविण्यास कारणीभूत असलेल्या शेख अरबाज उर्फ टी बाबा शेख जाफर वय 24 वर्ष आणि शेख तनवीर उर्फ तन्नू लाला शेख कलीम वय 24 वर्ष हे दोघेही राहणार वल्ली मामू दर्गा यांच्यावर महाराष्ट्र जातीय विरोधी सामाजिक कृत्य करण्याचा (एमपी डीए) कायद्याअंतर्गत आरोप ठेवून या दोघांची जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये हरसुल येथे एक वर्षाकरिता रवानगी केली आहे .राम मंदिर सोहळ्याच्या अनुषंगाने गस्त घालत असताना मोदीखाना येथे तीन व्यक्ती तोंडाला कपडा बांधून क्रमांक नसलेल्या दुचाकीवरून जात असताना त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन खंजीर आणि एक धारदार तलवार सापडली आहे . त्यापैकी एक जण दोन दिवसांपूर्वीच जामिनावर सुटून आला होता आणि इतर दोन त्याचे सहकारी होते .तसेच लोधी मोहल्ला कादराबाद येथील विकी राजसिंग राजपूत यांच्या घरातून एक धारदार कोयता  जप्त केला आहे. त्यासोबत याच भागातील राधेश्याम नारायण सिंग राजपूत यांच्या घरातून दोन धारदार तलवारी जप्त केल्या आहेत.

एकूणच आयोध्या येथे होणाऱ्या श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त या सर्व कारवाई करण्यात आल्या आहेत.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version