जालना- वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग शासन निर्णय 14 जुलै 2023 अन्वये जालना येथे शंभर विद्यार्थ्यांची एमबीबीएस प्रवेश क्षमता असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी मिळालेली आहे .त्या अनुषंगाने दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून डॉ. सुधीर चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आणि गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या तर्क वितरकांना , अफवांना श्रेयवादाला पूर्णविराम मिळाला आहे ,आणि आता प्रत्यक्षात या महाविद्यालयाचे काम सुरू झाले आहे.
वरील शासन निर्णयाप्रमाणे पूर्वी वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित करण्यात आलेल्या सर्वे नंबर 204/1, कन्हैया नगर येथील जागेची मोजणी करण्यात आली होती मात्र या जागेवर वनपरिक्षेत्र तसेच जालना शहर विकासाचे आरक्षण असल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे ही जागा सोडून शहरालगतच्या उपलब्ध असलेल्या शासकीय जमिनींचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्या अनुषंगाने ड्रायपोर्ट, देव मूर्ती, सामनगाव ,आदी ठिकाणी या जागा पाहण्यात आल्या परंतु त्या महाविद्यालयाशी सुसंगत नव्हत्या आणि शेवटी जालना शहरालगत असलेल्या आंबड रस्त्यावरील सर्वे क्रमांक 54 गणेश नगर जालना येथील 26 एकर जागा ही राष्ट्रीय आयुर्वेद विज्ञान परिषदेच्या निकषानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयापासून दहा किलोमीटर अंतराच्या परिसरात असणे आवश्यक असल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. कृष्णा पांचाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, आ. कैलास गोरंट्याल यांनी संमती दिली. त्या अनुषंगाने या महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी तयार करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. कृष्णा पांचाळ ,सदस्य सचिव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील सहसचिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी, सदस्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीमती पवार, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत), सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमती घोलप(अंभोरे) यांच्यासह नदीम शेख उपअभियंता श्री. नागरे यांनी विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या वस्तीगृहाची आणि नवीन इमारत तयार होईपर्यंत वर्ग चालवण्यासाठी तसेच विविध विभागांसाठी लागणाऱ्या खोल्यांची मंगळवार दिनांक 30 रोजी पाहणी केली. सामान्य रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या जुन्या परिचारिका वस्तीगृहाची इमारत त्याच बाजूला नवीन झालेली कोविड काळातील एक इमारत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रस्त्यावर असलेल्या कोविड सेंटरच्या इमारतीची पाहणी केली आहे आणि या इमारती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वापरण्यात येणार आहेत त्यासाठी या इमारतींची दुरुस्ती ही सुरू झाली आहे.
प्रस्तावित असलेल्या इमारतीचे बांधकाम चार वर्षात पूर्ण होईल असे अपेक्षित आहे या ठिकाणी प्रथम वर्षाचे 100 मुले आणि शंभर मुली द्वितीय वर्षाचे 100 मुले 100 मुली अशा चार वर्षाच्या या अभ्यासक्रमासाठी 400 मुली आणि 400 मुलांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. जून 2024 -25 मध्ये एमबीबीएसच्या पहिला तुकडीला प्रवेश देण्यात येणार आहे .विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा त्यांच्यासाठी अध्यापक भरती हा विभाग वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यामार्फत तर इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सामान्य आरोग्य विभाग यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यानुसार सामान्य आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी आणि जिल्हा शलचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिली आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172