जालना- जे मांगल्याचे प्रतीक आहे त्यांच्या प्रति आस्था आणि निष्ठा असणं हे कायद्यात जरी बसत नसलं आणि तो गुन्हा असेल तर असा गुन्हा मी पुन्हा पुन्हा करीन, असं ठाम मत आनंदगडचे मठाधिपती हरिभक्त परायण डॉ. भगवानबाबा आनंदगडकर यांनी व्यक्त केला आहे.
भगवानबाबा आनंदगडकर यांच्यावर लिहिलेल्या “अवघ्या साधनांचे सार, आनंद निधान” या पुस्तकाच्या प्रकाशासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे दिनांक 21 रोजी जालन्यात येत आहेत. यानिमित्ताने आनंदगडावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हालचाली सुरू आहेत का? का? हा गड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा केंद्रबिंदू बनत आहे? अशा चर्चा सुरू व्हायला लागल्या आहेत. त्यामुळे ज्यांच्या मनात असे प्रश्न उपस्थित होत आहेत त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देऊन भगवान बाबांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हे दिनांक 21 रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून आनंदगडाच्या सानिध्यात राहणार आहेत .विशेष निमंत्रितांना ते मार्गदर्शनही करणार आहेत. त्यासोबत आनंद गडाची पाहणी आणि त्यानंतर आनंदगडाच्या पायथ्याशीच असलेल विघ्ने लॉन्स येथे पुस्तकाचे प्रकाशन असा रात्री आठ वाजेपर्यंतचा कार्यकाल ते आनंदगडाच्या सानिध्यात घालवणार आहेत .त्यामुळे आनंद गडाला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्यामुळे सरसंघचालक एवढा वेळ इथे देत आहेत आणि म्हणूनच अनेकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण व्हायला लागले आहेत. कदाचित आनंदगडावर असलेल्या विविध समाजाच्या आणि धर्मांच्या महापुरुषांना एकत्रित केल्या गेल्यामुळे या एकात्मितीची भुरळ तर सरसंघचालकांना पडली नसावी ना? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण या गडावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, वस्ताद लहुजी साळवे ,संत गाडगेबाबा, संत नामदेव संत सेवालाल महाराज, राम भक्त शबरी, अशा सर्व समावेशक राष्ट्र पुरुषांचे पुतळे आहेत आणि वेळोवेळी इथे यांच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरी केल्या जातात. त्यामुळे भगवानगडावर सर्वच समाज बांधवांची उठ-बैस चालू असते. कदाचित संघाला अभिप्रेत असलेलं हे सर्व समावेशक ठिकाण असावं अशी शक्यता आहे. त्यामुळेच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत एवढा वेळ इथे देत आहेत असेही सांगण्यात येत आहे.(वरच्या व्हिडीओतसविस्तर मुलखात पहा)
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172