जालना- सनातन सकल समाज प्रणित शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने तेलंगणाचे आमदार राजासिंग ठाकूर यांची दिनांक 19 फेब्रुवारी रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेची तयारी ही पूर्ण झालीहोती. पोलीस प्रशासनाने दिनांक 18 फेब्रुवारीला पत्र क्रमांक 279 नुसार या सभेला परवानगी दिली होती. परंतु दिनांक 19 रोजी दुपारी अडीच वाजे सुमारास पोलीस प्रशासनाने आयोजकांना नोटीस बजावून ही सभा रद्द करण्यास भाग पाडले. त्यामुळे आयोजकांनी केलेल्या नियोजनावर पाणी फिरले.
असे असले तरी राजासिंग ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर जवळच असलेल्या रुपम हॉल येथे चार भिंतीच्या आत सभा घेतली आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व तयारीनिशी पुन्हा एकदा सभेचे आयोजन करा असे आवाहन केले .आत्तापर्यंत सुमारे 400 सभा झाल्या परंतु असे वातावरण कधीच पाहायला मिळाले नाही. काही लोकांच्या भीतीमुळे ही सभा रद्द करावी लागली आहे, भविष्यात सर्व तयारीनिशी पुन्हा अशी जाहीर सभा घ्या असेही ते म्हणाले.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172