जालना- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे बुधवार दिनांक 21 रोजी दिवसभर जालन्यात आहेत आणि त्यांचा मुक्कामही जालन्यातच होणार आहे .शिवनगर परिसरात असलेल्या सोमीनाथ खाडे या संघ कार्यकर्त्याच्या घरी ते मुक्कामाला राहणार आहेत. डॉ. भागवत यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे त्यामुळे त्यांच्या निवासाची आणि भोजन व्यवस्था ही अत्यंत काळजीपूर्वक केल्या जाते नव्हे तर शासकीय नियमानुसारच ती पार पडते. त्या अनुषंगाने मंगळवारी दिवसभर सोमीनाथ खाडे यांच्या घराची पाहणी पोलीस अधीक्षकांसह सर्वच विभाग प्रमुखांनी केली आहे ,आणि योग्य त्या सूचनाही दिल्या आहेत. बंदोबस्ताला  सुरुवात झाली आहे. एक असामान्य व्यक्ती जेव्हा सामान्य व्यक्तीच्या घरी जेवणासाठी आणि मुक्कामासाठी थांबतो त्यावेळेस या सामान्य व्यक्तीच्या जीवाची होणारी घालमेल, छातीचे वाढणारे ठोके ,आणि त्यासोबत एवढा मोठा माणूस आपल्या घरी जेवण  आणि मुक्काम करणार या आनंदाने भरून जाणारे उर आणि वाटणारा अभिमान या सर्वांची घालमेल कशी होते? यासंदर्भात सौ. वंदना सोमीनाथ खाडे यांची EDTV  NEWS  च्या वाचकांसाठी घेतलेली ही विशेष मुलाखत.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version