जालना -अवैध वाळूचा उपसा थांबविण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला वाळू माफियांनी मारहाण केली. यामध्ये संबंधित तलाठी गंभीर जखमी झाला असून सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे .याप्रकरणी जालना तालुक्यातील रोहनवाडी येथील भरत बद्रीनाथ कुटे याच्यासह अन्य दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करणार करण्यात आला आहे.
जालन्याच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार रोहनवाडी सज्याचे तथा पाचनवडगाव चा अतिरिक्त पदभार असलेले तलाठी इरफान अकबर शेख हे आज सकाळी सात वाजेच्या सुमारास पाचनवडगाव येथील कुंडलिका नदीपात्रात अवैध वाळू उपसा थांबविण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत पोकळवडगाव येथील तलाठी व्ही.बी. कणके आणि दुधना काळेगाव येथील तलाठी एम.जी. सोनवणे हे देखील होते .
दरम्यान सकाळी 7 वा. नदीपात्रात उतरल्यानंतर तिथे काही ट्रॅक्टर वाळू भरताना दिसले ।यावेळी चौकशी केल्यानंतर एका ट्रॅक्टर चालकाने संबंधित ट्रॅक्टर हे भरत बद्रीनाथ कुटे याचे असल्याचे सांगितले. त्यानुसार या ट्रॅक्टरचा चालक आणि तलाठी इरफान अकबर हे ट्रॅक्टर जालना तहसील कडे घेऊन येऊ लागले .उर्वरित दोन ट्रॅक्टरही त्यांच्या मागे होते आणि या ट्रॅक्टरच्या मागे सोबत असलेले दोघे तलाठी दुचाकीवरून येत होते. नदीपात्रातून गावाजवळ येतात मागील दोन ट्रॅक्टर चालकांनी आपले ट्रॅक्टर वेगाने चालवत गावात ग्रामपंचायतकडे नेले आणि ट्रॅक्टर सोडून पळ काढला. दरम्यान भरत कुटे याचे ट्रॅक्टर वर बसून तलाठी जालना तहसील कडे येत असताना रस्त्यात भरत कुटे भेटला आणि तिथे चालकाला खाली उतरून स्वतः कुटे चालवायला बसला. काही अंतर गेल्यानंतर भरत यांनी काही सहकाऱ्यांना फोन करून बोलावून घेतले आणि तलाठी इरफान अकबर शेख यांना खाली पाडून लाथा बुक्क्याने मारहाण केली. यामध्ये तलाठी गंभीर जखमी झाला आहे आणि सध्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणला आणि मारहाण केल्याचा गुन्हा तलाठी इरफान शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भरत बद्रीनाथ कुटे आणि अन्य दोघांविरुद्ध नोंदविण्यात आला आहे.
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com