जालना- जालना लोकसभा मतदारसंघाची काल दिनांक चार रोजी मतमोजणी पार पडली आणि या मतमोजणी मध्ये दिनांक 3 जून रोजी edtv jalna न्यूज ने व्यक्त केलेला अंदाज 100% खरा ठरला आहे. एकूण 26 उमेदवारांपैकी 23 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल असा तो अंदाज व्यक्त केला होता. त्यासंदर्भात दिनांक 3 जून रोजी बातमीही प्रकाशित केली होती आणि तसेच झाले आहे. डिपॉझिट म्हणजेच अनामत रक्कम परत मिळविण्यासाठी झालेल्या मतदानापैकी 16 टक्के मते मिळविणे गरजेचे असते. त्यानुसार कालच्या मतमोजणी मध्ये केवळ तिघांनीच हा टप्पा पार केला आहे .1357,971 मतांची मोजणी केल्या गेली त्यानुसार 16% च्या हिशोबाने 84874 मते प्राप्त करणे आवश्यक होते . डिपॉझिट वाचवण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांपेक्षा जास्त मतं मिळविणारे काँग्रेसचे कल्याण वैजनाथराव काळे यांनी सहा लाख पाच हजार पाचशे चार मते मिळवली, त्या पाठोपाठ भारतीय जनता पक्षाचे रावसाहेब दानवे यांनी चार लाख 95 हजार 809 मते मिळविली तर तिसऱ्या स्थानावर मंगेश संजय साबळे या अपक्ष उमेदवाराने एक लाख 55 हजार 335 मते मिळविले आहेत. त्यामुळे या तिघांचे डिपॉझिट जप्त झाले नाही.
झालेल्या एकूण मतदानापैकी एकूण 16 अपक्ष उमेदवारांनी एक लाख 88 हजार 583 मध्ये घेतली आहेत.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172