जालना- लोकसभा मतमोजणीच्या ठिकाणी प्रशासनाच्या दिरंगाईचे आणि मनमानी कारभाराचे अनेक किस्से पाहायला मिळत होते .त्यातीलच एक महत्त्वाचा आणि संवेदनशील किस्सा म्हणजे भोजन व्यवस्थेमुळे मनमानीपणाने काढून टाकलेली सुरक्षा रक्षक पत्रे .पोलिसांना कोणतीही पूर्व सूचना न देता या सुरक्षेची पत्रे काढून टाकल्यामुळे पोलीस कर्मचारी चांगलाच भडकला आणि “आम्हाला तुमच्यामुळे नोकरी असे खडे बोल सुनावले.”

एकीकडे मतमोजणी केंद्राच्या सभोवताली पत्राच्या उंच भिंती उभारून कडक बंदोबस्त ठेवलेला होता.  प्रवेशद्वारावर कसून चौकशी आणि तपासणी केली जात होती. असे असताना दुसरीकडे ज्यांच्याकडे भोजन कक्षाची जबाबदारी होती त्यांनी मात्र या सर्व नियमांना कचऱ्याची टोपली दाखवली आणि मनमानी पद्धतीने काम केले .पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना न देता भोजन कक्षाच्या समोरच सुरक्षेसाठी लावलेली पत्रे काढून टाकली त्यामुळे हा रस्ता मोकळा झाला आणि इथून पाणीपुरवठ्याचे वाहन आत मध्ये येऊ लागले.  इतर लोकांनी देखील या रस्त्याचा वापर केला आणि पोलिसांना झुंगरा देऊन मतमोजणी केंद्राकडे जाण्यासाठी आणि येण्यासाठी याचा वापर सुरू केला . पत्रे काढण्यासाठी आलेला आवाज ऐकून मुख्य प्रवेशद्वारावर असलेले पोलीस यांना “कुछ तो गडबड है”चा अंदाज आला आणि त्यांनी या आवाजाचे दिशेने कूच केली त्यावेळी येथील अनेक पत्र काढून टाकली होती आणि रस्ता मोकळा झाला होत. त्यामुळे संतप्त झालेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांनी तिथे असलेल्या खाजगी सेवकाला चांगलेच झापले . सेवकाने सांगितले की मला मॅडमनी सांगितले होते. आता या मॅडम कोण तर जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर. पोलिसांनी या खाजगी कर्मचाऱ्याचे ओळखपत्र ठेवून घेतले आणि मॅडमला पाठवून द्या असे फर्मान सोडले. काही वेळांनी मॅडम मुख्य प्रवेशद्वारावर आल्या आणि हे प्रकरण निकाली निघाले. अशा संवेदनशील ठिकाणी जर काही दुर्घटना घडली असती तर पोलिसांना नक्कीच नोकरी गमवावी लागली असती हे मात्र नक्की.

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

Share.

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

Comments are closed.

Exit mobile version